पान:हिंदी राष्ट्रवाद.pdf/21

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ब्रिटीशपूर्व राष्ट्रवाद ११ हिंदुस्थान हा अत्यंत प्राचीन देश आहे. त्याला सांप्रतचे राष्ट्रीय ।। स्वरूप ब्रिटिश अमलाखाली प्राप्त झाले. ह्मणून याला मागील इतिहास नाही असे #ग अर्थात् अवार्तव आहे. उलट, मानवी संस्कृतीचा जन्म याचाठकाणी झाला अद. तिचा पाळणाई येथेच हलला आहे. अख्ली मानव जात संस्कृती व ज्ञानाचे प्राथमिक धडे याच देशापासून पडलेली आहे. जगातला आदिग्रंथ ऋग्वद हा हिंद भूमीतच लिहिला गेला. यावरून हिंद देश हा आरंभापासूनच राष्ट्र होते असे होणता येणार नाही. राष्ट्रवादाची कल्पनाच मुळी अर्वाचीन ! खुद्द तिच्या मायभूमीत ह्मणजे युरोप खंडात तिचा जन्म होऊन अद्याप तीनशे वही झाली नसतील ! मग, तीन चार हजार वधाच्या पूर्वीपासून हिंदुस्थान हे एक राष्ट्र हाते । असे हाणण्यात काय हशील ? येथे मोठमोठाली साम्राज्ये अस्तित्वात होत हे खरे आहे. मौर्य, हर्ष, चालुक्य, मंगल, मराठे इत्यादि राज्यानी अर्धा अधिक हिंदुस्थान व्याप्त होता यात शंका नाही. पण या साम्राज्यांच व इतर तत्कालीन राज्यांचे स्वरूप पैतृक ( 1:0ftar: 1:00:clia 1 ) अगर सरंजामा ( Feuda l ) असे होते. या राज्यविस्तारांच्या बुडाशी कोणत्याही जनसमुदायाच्या आकांक्षा नव्हत्या, वैयक्तिक, कौटुंबिक किंवा सरंजामी * महत्वाकांक्षा' या त्यातील प्रेरक शक्ती होत्या. राजा हा पिता व प्रजा ही त्याची मुले; राजा हा स्वामी व प्रजा ही त्याची नोकर अशा कल्पनांचा अमल तत्कालीन राजशक्तींच्या मुळाशी होता. राज्यकारभारात प्रजेला कोणतच अधिकार । नव्हते. इतकेच नव्हे, तर प्रजेला अगर जनतेला काही हक्क असतात ही कल्पनाच त्या काळा कोणत्याही सुबुद्ध मेंदूला शिवलली नव्हती. राज्य या शद्वात राजसत्ता अभिप्रेत असते आणि राष्ट्र या कल्पनेच्या बुडाशी जनसत्तेची कल्पना असते. सारांश, राज्य राजाचे, तर राष्ट्र लोकांचे. तेव्हा मोठमोठाली राज्यसाम्राज्ये अस्तित्वात होती, याचा अर्थ ती राष्ट्रवादाच्या । कल्पनेने प्रेरित होती, असा होत नाही.