पान:हिंदी-सुमेरी संस्कुती.pdf/२४

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(२०) याप्रमाणे नमुन्यादाखल पांच शिके व त्यांचे खुलासे दिले आहेत. यांपैकी पहिल्यांतील एदिन हे नांव सिंधुनदाच्या प्रदेशांतील भागास दिलेले होते, हे या खाली दिलेल्या नकाशावरून दिसून येईल. दसऱ्यांत ब्राह्मणा ( वर्णाचा ) चा स्प उल्लेख आहे. अर्थात् ऋग्वेदांतील पुरुषसूक्त या पूर्वीचे आहे व त्यावेळी चातुर्वर्ण्य- पद्धति रूढ झाली होतो हे स्पष्ट होते. कण्व हा मोठा कुलपति होता. मुनीनां दशसा- हवं योऽन्नदानादिपोषणात् । अध्यापयति विप्रर्षिरसो कुलपतिः स्मृतः ॥ अशी कल- पांची व्याख्या केलेली आहे. तिसऱ्यांतील खैतिलिंग या शब्दाचा अर्थ मुख्य पुरो- हित असा आहे. चौथ्यांत अगडु शहराचा उल्लेख आहे. अगडूचा अर्थ अयोध्या आहे. आपल्या इकडील पुराणांतूनही अयोध्येच्या सूर्यवंशीय राजांच्या वंशावळीत सुषेण याचें नांव दिलेले आहे. सगर राजाचा उल्लख पांचव्या शिकवांत आहे. हा राजा स्वर्गातील भागीरथी नदी भूलोकावर आणण्याबद्दल पुराणांत उल्लेखिलेला आहे. अशा रीतीने पुराणांत प्रसिद्ध असलेल्या प्राचीन पुरुषांचे उल्लेख या शिकचावर आलेले आहेत. या एकंदर विवेचनाचा निष्कर्ष सामान्यतः असा निघतो की, ख्रिस्तपूर्व सहा सात हजार वर्षापासून हिंदुस्थानात एक प्रकारच्या सुसंस्कृत लोकांची वस्ती होती त्या लोकांना विटांची उत्तम घरे बांधतां येत. त्यांना उत्तम प्रकारचे स्थापत्य कलेचे ज्ञान होते. तांबे, शिसे, रुपे, सोने, वगैरे धातु लांना चांगल्या माहीत असून त्यांचे अलंकार ते करीत. त्यांवर खोदकाम करीत, प्रथम प्रथम ते आपले लिखाण एक प्रका. रच्या चित्रलिपीने करीत, व पुढे पुढे एक प्रकारची अक्षर लिपीहि ते वापरू लागले होते. निरनिराळी रत्ने त्यांना माहीत असून त्यांचे ते हार, माळा वगैरे करून वापरीत असत, चाकू, सुन्या वगैरे पदार्थ त्यांना परिचित होते. याहून विशेष महत्त्वाचा शोध तर नुकताच महिना पंधरा दिवसापूर्वीच प्रसिद्ध झाला आहे की, माहेंजो-दारो येथे कांही कापसाचे विणलेले कापड सांपडले होते. ते खरोखर ही ज्याला आपण कापूस म्हणतो. याचेच आहे किंवा दुसऱ्या एखाद्या वनस्पतीच्या तंतूचे विणलेले आहे. यांचे बारीक संशोधन करून युरोपियन तज्ञ संशोधकांनी सरकारी रीतीने प्रसिद्ध केले आहे की ते हल्लोंच्याच कापसाचे केलेले होते; यावरून ते लोक कापसाची वस्त्रे वापरीत असत हेहि सिद्ध होते, त्यांची मोठमोठाली शहरे वसलेली होती. याप्रमाणे सुमारे खि पू. ३५०० अथवा चार हजार वर्षेपर्यंत त्यांचीच राज्ये हिंदुस्थानांत चालत होती. त्यानंतर या देशांवर आर्य लोकांनी स्वारी केली व एतद्देशीय लोकांना त्यांनी जिंकले. हे एतद्देशीय लोक, रुंद डोक्याचे, अरुंद कपाळाचें, बसक्या नाकाचे, व जाड ओठांचे असत. अर्थात् ते द्रविड वंशीय होते. बलुचिस्थानांतील बहुई भाषा ही. द्रविड वंशीय भाषाच आहे, हे अलीकडील भाषाशास्त्रज्ञांचे प्रमाणहि याच सिद्धांताला पुष्टि देते. जेत्या आर्यांनी आपला सृष्टिस्तुतिपर वेद रचिला व नंतर त्याचीच परिणति यज्ञयागा- दिपर धर्मात झाली. हा त्यांचा धर्म स्वाभाविकच जित द्रविडांनी क्रमाक्रमाने स्वीका-