पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
प्रकाशकाची प्रस्तावना.


 स्वामी विवेकानंद यांच्या संपूर्ण ग्रंथावलीचा नववा खंड वाचकांस आज आम्ही सादर करीत आहो. आणखी दोन खंडांत ही ग्रंथावली पूर्ण होईल. हे काम शक्य तितक्या लवकर पुरें करून अशाच प्रकारच्या दुसऱ्याही ग्रंथाचे प्रकाशन हाती घ्यावे, असा आमचा विचार होता व अद्यापिही तो आहे; पण अशा प्रकारच्या कार्यातील मुख्य अडचण सर्वश्रुत आहेच. अशा प्रकारच्या ग्रंथांस वाचक आधीच बेताचे, आणि त्यांतील बहुतेक, मध्यम वर्गातील असावयाचे. यामुळे केवळ धंद्याच्या दृष्टीने हा व्यवहार यांत बट्याचाच होतो. सर्व प्रकारच्या छपाईच्या सामानाची महागाई कल्पने पलीकडे झाली असतांही आम्ही प्रस्तुत मालेची किंमत फारशी वाढविली नाही. त्यांतून भरीतभर म्हणून पुस्तके मागवून व्ही. पी. परत करणारे उद्धारधीही भेटतातच. ही माला पुरी होऊन अशाच प्रकारचे आणखीही काही ग्रंथ प्रसिद्ध होणे इष्ट आहे, असे आमच्या वाचकांस वाटत असल्यास त्यांनी नवे वर्गणीदार मिळवून देऊन आम्हांस साहाय्य करावे. अशी विनंति करतो.