पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२३४ स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.[ नवम


यावर मी त्याला उत्तर दिले, 'हिंदुस्थानाची रीत अशीच आहे. हिंदुस्थानांतील ग्रंथकारांची सारीच पद्धत अर्वाचीन लेखकांहून अगदी वेगळी आहे. अर्वा चीन पद्धतीच्या ग्रंथकाराच्या लेखांत शेकडा नव्वद कल्पना दुसऱ्यांच्या चोरलेल्या असल्याचे तुम्हांस आढळून येईल; आणि ज्या शेंकडा दहा त्यांच्या स्वतःच्या असतात, त्या अस्मादिकांच्या स्वतःच्या आहेत असें प्रस्तावनेंत नमूद करण्यास ते सहसा चुकत नाहीत. आमच्या प्राचीन ग्रंथकारांचा प्रकार याहून अगदी वेगळा. सान्या मानवजातीच्या हृदयांत विचारांची क्रांति ज्यांच्या लेखांनी झाली ते आपले ग्रंथ लिहून मोकळे झाले. त्यांनी आपल्या लेखांवर नांवें घालण्याइतकीही खबरदारी घेतली नाही. ते जन्मले कोठे आणि मेले केव्हां याचाहि पत्ता कोणास लागला नाही. आपल्या वंशजांकरितां आपला अपूर्व ठेवा मागे ठेवून कोणास नकळत त्यांनी देहविसर्जन केलें. हिंदुस्थानांत तात्त्विक वाङ्मयाचे केवढे तरी भांडार आहे, पण त्या सा-यांच्या लेखकांची नांवें कोणास माहीत आहेत ? आमची पुराणे कोणी लिहिली याचा शोध लागेना तेव्हां सारी व्यासांच्या गळ्यांत पडली. एखादा तात्त्विक ग्रंथाच्या कर्त्यांचा शोध लागला नाही ह्मणजे कपिल मुनींकडे खुशाल बोट दाखवावें. हे लेखक म्हणजे भगवान् श्रीकृष्णांचे अस्सल वंशज होत. गीतेची तत्त्वे त्यांनीच खरोखर पाळली. 'कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन या गीतावचनाचा अर्थ खरोखर त्यांनीच सांगितला.
 अशा रीतीने हिंदुस्थानाचे कार्य साऱ्या जगांत चालू आहे; पण तें चालू राहण्यासाठी एका गोष्टीची आवश्यकता आहे. व्यापारी मालाची नेआण कर ण्यास ज्याप्रमाणे मनुष्याचे साहाय्य अवश्य आहे, त्याचप्रमाणे धर्मज्ञानाच्या प्र सारालाहि कोणातरी देहधा-याच्या आश्रयाची आवश्यकता असते. आधी मार्ग तयार असल्यावांचून विचारांचाहि प्रवास होऊ शकत नाही. पूर्वीहि असेच प्रकार घडून आले आहेत. एखादें जगज्जेतें राष्ट्र जन्मास आले म्हणजे आपल्या क्षात्रतेजाच्या बळावर जगांतील दूरदूरची राष्ट्रं तें एकत्र करिते. त्या राष्ट्रांचा परस्परांशी संबंध जडतो. अशा रीतीने विचारविनियमाचा मार्ग तयार झाला म्हणजे त्याच्या द्वारें हिंदुस्थानांतील विचारपरंपरा साऱ्या जगाचा प्रवास करूं लागते; आणि अशा रीतीने जगांतील सा-या मानवकुलांत तिचा प्रवेश होतो. बौद्ध धर्म जन्मास सुद्धां आला नव्हता तेव्हांहि हिंदु तत्त्वज्ञानाचा