पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/३२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

राशी आणि त्यांचे स्वामी (ग्रह) - मेष, वृश्चिक मंगळ वृषभ, तुला मिथुन, कन्या कर्क सिंह धनू, मीन मकर, कुंभ ग्रह विशेष सूर्य (रवि) - सूर्यनारायणाच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याचे - ग्रह, नक्षत्र, राशी यांचे- निश्चित असे कारकत्व आहे. ग्रहाच्या या विशेष गुणांमुळे सूर्याचे त्यांच्याशी वागणे-बोलणे-वृत्ती बदलतात. उदाहरणार्थ- मेष, कर्क, सिंह, धनू या राशिंमध्ये रवी असल्यास तो यश-कीर्ती-समृद्धी प्रदान करतो. सर्वच क्षेत्रांमधील प्रयत्नांना राजयोग मिळतो. रविला राशिचक्राची पूर्ण प्रदक्षिणा घालण्यासाठी तीनशे पासष्ट दिवस लागतात. म्हणजे सूर्य हा एका राशीच्या घरामध्ये साधारणपणे तीस दिवस मुक्कामाला असतो. शुक्र बुध चंद्र रवि गुरू शनि चंद्राचे मुख्य कारकत्व मन, चंचल मन मातृकारक म्हणून चंद्राचा विचार करतात. चंद्र कर्क राशीचा अधिपती आहे. चंद्र-बुध योग बुद्धीमत्ता वक्तृत्व निर्देशक आहे. चंद्राला राशीचक्राची पूर्ण प्रदक्षिणा घालण्यासाठी सत्तावीस दिवस सात तास लागतात. मंगळाचे मुख्य कारकत्व पराक्रम, विजय भूमिपुत्र, कुज, लोहितांग ही त्याची इतर नावे आहेत. हा राजासूर्याचा सेनापती आहे. तसेच मेष व वृश्चिक राशींचा स्वामी आहे. बुधाचे मुख्य कारकत्व ज्ञान व वाणी आहे. त्याला रौहिणेय असेही म्हणतात. सूर्य (रवी) राजा तर बुध हा युवराज आहे. हा मिथून व कन्या राशींचा स्वामी आहे. सूर्यनमस्कार एक साधना २८७