पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सतिश शंकर शुक्ल

अध्यक्ष : श्री शुक्ल यजुर्वेदीय माध्यदिन ब्राह्मण संस्था, नाशिक अध्यक्ष : श्री गंगागोदावरी पंचकोठी पुरोहित संघ, नाशिक कार्याध्यक्ष : गुलालवाडी व्यायाम शाळा, नाशिक माजी नगरसेवक : नाशिक महानगरपालिका, नशिक निवास : गंगामंदिर सोसायटी, यशवंतराव महाराज पटांगण, नाशिक. फोन: ०२५३-२५०२५५२

  • आदर्श नगरसेवक * जिल्हा भूषण
  • श्री याज्ञवल्क्य भूषण
  • गोदारत्न

प्राप्त पुरस्कार :

शुभाशीर्वाद * श्री सूर्यस्थान समर्थ विद्यारोग्य केंद्र नाशिकचे अध्यक्ष / प्रकाशक सुभाष भगवंतराव खर्डेकर यांनी लिहिलेल्या 'सूर्यनमस्कार साधना' या कार्यपुस्तिकेस 'हार्दिक शुभेच्छा!' हार्दिक अभिनंदन!! भगवान सूर्यनारायणाकडून आरोग्य व आनंद याचा आशीर्वाद मिळविण्यासाठी सूर्योपासना स्वीकारणे आणि त्याची साधना करणे हे अत्यावश्यक आहे. सूर्यनमस्कार साधनाचे मार्गदर्शन करणारी, परिश्रमपूर्वक तयार केलेली कार्यपुस्तिका सद्गुरु रामदास स्वामी यांना सविनय अर्पण करण्यात आलेली आहे. या कार्यपुस्तिकेचे लेखन ही श्री. सुभाष खर्डेकरांची अत्यंत लोकोपयोगी सेवा आहे. सूर्यनमस्कार ही शक्तीची, अग्नीची, तेजाची उपासना आहे. ती मन-बुद्धी - शरीर यावर सारख्याच प्रमाणात प्रभाव टाकणारी आहे. म्हणूनच स्वत:चे मन-बुद्धी-शरीर निरोगी राहण्याकरिता, सुदृढ होण्याकरिता सूर्यनमस्काराची नियमित स्वयंसाधना अत्यंत उपयुक्त आहे. वेद-पुराणांमध्ये तसेच आदित्य संप्रदाय प्रवर्तक चतुर्वेदाचे प्रणेते महर्षि योगीश्वर याज्ञवल्क्य यांनी सूर्यउपासनेचे महत्त्व सूर्यस्तोत्रात विषद केलेले आहे. सदृढ शरीर, निरोगी मन- - बुद्धी ही मानवी जीवनातील आवश्यक व अमूल्य गोष्ट आहे. ती मिळवण्याकरीता सूर्यनमस्काराची स्वयंसाधना नियमितपणे करणाऱ्या साधकास उत्तम आरोग्य, सुदृढ शरीर, निरोगी मन-बुद्धी लाभो, हि भगवान सूर्यनारायण, माता गंगा गोदावरी, भगवान श्री काळाराम, भगवान श्री कपालेश्वर, आदित्य संप्रदाय प्रवर्तक महर्षि योगीश्वर याज्ञवल्क्य आणि सद्गुरु समर्थ रामदास स्वामी यांचे चरणी प्रार्थना. कार्यपुस्तिकेस पुनश्च: एकदा हार्दिक शुभेच्छा! सतिश शंकर शुक्ल अध्यक्ष : श्री शुक्ल यजुर्वेदीय माध्यदिन ब्राह्मण संस्था, नाशिक ( शब्दांकन : अॅड. भानुदास गजानन शौचे, नाशिक) सूर्यनमस्कार एक साधना XXV