पान:सुखाचा शोध.pdf/८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण सातवें. साठीं तुझी माझा तिरस्कार करतां, त्याच कारणासाठीं कांहीं माझा सत्कारहि करीत आहेत, हें तुला दिसून येईल. दिनकरनें दिलेलें पत्र काळजीपूर्वक वाचून पाहून उमा ह्मणाली, " भावोजी, कोणी हैं पत्र लिहिले ? " पत्र खिशांत ठेवून दिनकर ह्मणाला, “मालतीनें. मुंबईला वामनराव नांवाचे एक गृहस्थ आहेत त्यांची ती मुलगी. मदन आणि वसंत या नांवाचे तिचे दोन धाकटे भाऊ आहेत, त्या दोघांना मी शिकवीत असतो. केव्हां केव्हां मालतीलाहि शिकवीत असतो. " “ मालती किती वर्षांची आहे?" “ आहे पंधरा सोळा वर्षांची. " उमा आश्चर्याने ह्मणाली, " पंधरासोळा वर्षांची! एवढी मोठी मुलगी काय शिकत असते ? तिचें लग्न झाले असेल ? " " 66 'वामनराव सुधारक आहेत. मुलांचं लहानपणीं लग्न करणें त्यांना पसंत नाहीं. मुलीला चांगले शिक्षण देऊन मग ते तिचे लग्न करणार आहेत. " " ह्मणजे ! आतां आणखी किती, पंचविसाव्या की तिसव्या वर्षी तिचें लग्न करणार ? वरें, ते असो; पण ती दिसावयाला कशी आहे ? " “ मी काय तिला शिकवितांना तिच्या चेहऱ्याकडे पहात बसतों ? ” “ खरेंच, हें मी अगदीं विसरूनच गेलें. तिचा आणि तुमचा गुरु- शिष्याचा संबंध नाहीं का ? " “ खरें सांगावयाचें म्हणजे, तिचा आणि माझा पैशाचा संबंध. त्या तिघांना शिकविण्याबद्दल मला वामनराव पंधरा रुपये देतात. त्यांनी जर मला हे पंधरा रुपये देण्याचें बंद केलें, तर हा गुरूशिष्य संबंध तुटाव- याला कांहीं वेळ लागणार नाहीं. त्याच्याशी कांहीं कर्तव्य नाहीं. माझ्या संबंधाने त्यांना काय वाटतें, तें या पत्रावरून पहा म्हणजे झालें." , 66 या पत्रावरून वामनराव मोठे भले दिसतात. तुमच्या या खट- ल्याला जो कांहीं खर्च लागेल, तो करण्याची त्यांची इच्छा दिसते. " दिनकर बराच उत्साहित होऊन ह्मणाला, “एवढेच नाहीं, तर माझ्या