पान:सुखाचा शोध.pdf/८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण सातवें. आहे. आपल्या या साहसाचें अनुकरण सर्व तरुणांकडून झाल्यास प्रवासांत वगैरे स्त्रियांना जो अपमान सहन करावा लागतो, तो लागणार नाहीं. सभेत बृहस्पतीप्रमाणे भाषणे करण्यापेक्षां अन्याय आणि अनीतीला अशा रीतीनें सक्रीय प्रतिरोध करणें नि:संशय अधिक कल्याणप्रद आहे, असे बाबांचें ह्मणणें आहे आणि त्या दृष्टीने सगळे महाराष्ट्रीय आपला गौरव करीत आहेत. असो. पत्रोत्तर पाठवून या खटल्याची एकंदर हकीकत कळवा. पैशाची जरूर असल्यास तलें लिहा. संकोच बाळगूं नका, आह्मी सर्व कुशल आहों. आपणहि आपले कुशल कळवा. कळावें, ही वि. आपली मालती. & मालतीचें हें पत्र वाचून पाहून दिनकरच्या चित्तवृत्ति उचंबळून आल्या आणि थोडा वेळ त्याची स्थिति वेड्यासारखी झाली. भुसावळच्या. स्टेशनावर त्यानें जें वर्तन केलें होतें, तें कितीहि योग्य असे असले, तरी त्याचा परिणाम अनिश्चित असा असल्यामुळे सगळ्यांच्या चेहऱ्यावर विषा- दाची छाया पसरली होती. सगळ्यांना त्याची ही कृति दुःसाहसिक वाटत होती. दुसऱ्यावर परोपकार करतांना स्वतः विपन्न होणें, हे लोकांच्या दृष्टीने कितीहि चांगले असले, तरी आप्तस्वकीयांना साहजिक काळजी. वाटते आणि या न्यायाने दिनकरला हें विकतश्राद्ध घेतल्याबद्दल जो तो दोप देत होता. त्याचा चुलत भाऊ भास्कर हा स्वभावतःच शांत प्रकृ तीचा होता. तट्या बखेड्याचा त्याला फार कंटाळा होता. कोणाला उप- सर्ग लावूं नये आणि कोणाचा उपसर्ग लावून घेऊं नये असा त्याचा स्वभाव असल्यामुळे त्याला दिनकरचा अर्थात्च राग आला. त्यानें या- संबंधानें दिनकरला दोन उपदेशाच्या गोष्टी सांगून कोर्टात काम चालवि ण्यासाठीं वकिलाची व्यवस्थाहि केली. दिनकरची आई तर त्याला शिव्या देऊन गोंजारीतहि होती आणि आलेले संकट टळावें ह्मणून तिनें देवाला नवसहि केले होते. पत्नीनेंहि द्यावा तसा त्याला उत्साह दिला नव्हता. दिनकरवरच्या निस्सीम प्रेमामुळे तिचें मन या खटल्यानें साहजिक साशंक