पान:सुखाचा शोध.pdf/७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७२ सुखाचा शोध. कित्येकांना भुसावळपर्यंत चांगली झोंपहि मिळाली. गाडी भुसावळच्या स्टेशनावर आल्यावर सगळे खडबडून जागे झाले आणि येथें अर्धा तास गाडीचा मुक्काम असल्यामुळे हे विद्यार्थी प्लॅटफॉर्म वर उतरून इकडे तिकडे हिंडू लागले. दिनकरहि गाडीच्या कांठाकांठानें हिंडत असतां एका डब्या- च्या दाराशीं थोडी गर्दी दिसल्यामुळे तेथे काय आहे, तें पाहण्यासाठी गेला. बायकांच्या डब्याच्या दाराशीं एक सुस्वरूप हिंदु तरुणी उभी असून एक युरेजियन तिकिट कलेक्टर तिच्याजवळ तिकिट मागत होता. 'आपले तिकीट पुरुष मंडळीजवळ आहे. त्यांच्याजवळ शोध करा' असें तिनें सांगितलें; पण ते त्या तिकीटकलेक्टरास पसंत न पडून तो तिच्याशीं लगट करून तिकीट माणूं लागला. तेथें पांच सहा इसम होते; पण ते शांतपणें हा तमाशा पहात होते. दिनकरला या सर्व लोकांचा अर्थातच फार राग आला. इतक्यांत तो युरेजियन केवळ पाजीपणानें त्या तरुणीजवळ तिकीट मागत आहे व तिचा हात धरण्याचा प्रयत्न करीत आहे, असे पाहून दिनकर वज्रगंभीर स्वरानें, 'षंढानो, येथे का हा तमाशा पहावयाला जमलां आहां ?' असे हाणून त्या गर्दीतून चटकन् पुढे झाला आणि त्यानें एक वज्रमुष्ठी त्या युरेजियनच्या पाठींत अशी सणसणून दिली कीं, त्या स्वारीनें बैठकच मारली. दिनकरनें त्याचा हात धरून त्याला खाली ओढले आणि मो- ठ्यानें ' पोलीस पोलीस ' ह्मणून तो ओरडला. इतक्यांत पोलीस व दिन- करबरोबरचे विद्यार्थी तिकडे धांवले. रोजच्या ओळखीच्या पोलिसांना पाहतांच युरेजियन तिकीट कलेक्टरला मोठें अवसान चढलें. पोलीसकडे वळून तो म्हणाला, “ पकडो, इस अदमीको. इसने हमको मारा है! " दिनकरहि तशाच त्वेषाने म्हणाला, " या बदमाशाला पकडा. यानें त्या सभ्य स्त्रीच्या अंगावर हात टाकला आहे." इतकें जो होत आहे, तो त्या दोघांच्याहि भोवतीं बरीच गर्दी जमली. जो तो दिनकरला शाबासकी देऊन त्या तिकीट कलेक्टरला शिव्या देऊं लागला. कित्येक प्रवाशांना तर या घोटाळ्याचा कांहीं अर्थच समजला नाहीं. एकजण दिनकरकडे बोट करून दुसऱ्याला म्हणाला, "तो मनुष्य विन तिकीटावांचून प्रवास करीत होता, ह्मणून त्याला पकडलें आहे. " तिसरा एकजण म्हणाला,