पान:सुखाचा शोध.pdf/६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण सहावें. ६९ दारांत नुसतें डोकावलें, तरी ते त्याला 'जागा नाहीं ' ह्मणून मोठ्यानें ओरडून सांगत. बिचारे उतारू गाडी सुटेल या भीतीनें कोठें तरी जाऊन. बसत. इतक्यांत एक गरीब उतारू दाराशीं आला, आणि दार उघडूं लागला. त्याबरोबर हे मोठ्या पोटाचे गृहस्थ दार ओढून घेऊन म्हणाले, गाडींत जागा नाहीं. दुसऱ्या डब्यांत जा. तो उतारू दनिवाणीनें ह्मणाला, 66 महाराज, गाडी सुटायची वेळ झाली. मला कृपा करून आंत येऊं द्या. जागा नसली तर मी उभा राहीन." 66 " पण त्या गृहस्थाला त्याची दया आली नाहीं. उलट रागावून तो ह्मणाला, “ येथे जागा नाहीं ह्मणून तुला सांगितलें ना ? दुसऱ्या डब्यांत जाऊन वैस. नाहीं तर मागावून गाडी येईल तींतून जा." गृहस्थानें गाडीच्या मालकाचीच ऐट आणली होती. तो बरीत्र उतारू पुन्हा गयावया करून ह्मणाला, महाराज, दार उघडा, मला आंत येऊ द्या. माझे फार जरुरीचें काम आहे. मला या गाडीनें गेलेच पाहिजे. " 66 या विनवणीला ते गाडीचे मालक दाद देईनात. ते त्याच्यावर ओर- डून ह्मणाले, " जंगली, जा, दुसऱ्या डब्यांत जा. येथे जागा नाहीं, हैं तुला दिसत नाही का ? " इतक्यांत गार्डानें शिटी वाजविली आणि आपल्या हातांतला कंदीलहि हलविला. त्याबरोबर त्या उतारूचा चेहरा अधिकच खिन्न झाला. इतक्यांत धांवत जाऊन दिनकरनें धाडकन् दरवाजा उघडला आणि त्या उतारूला त्यानें वर घेतलें. इकडे गाडीहि चालू झाली. आपणास गाडी तर मिळाली, हे जाणून त्याला फार आनंद झाला व 'महाराज, तुमचें कल्याण होवो' असा त्याने दिनकरला आशीर्वाद दिला. हा एकंदर प्रकार अग दींच अल्पावकाशांत घडला होता. ते चष्मेवाले गृहस्थ यामुळे दिनकरवर चरफडले आणि म्हणाले, “ त्याला कोठें आतां तुम्ही आपल्या डोक्यावर बसविणार ? " दिनकर शांतपणे ह्मणाला, " मी माझ्या जागेवर बसवीन आणि मी स्वतः उभा राहीन. "