Jump to content

पान:सुखाचा शोध.pdf/६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण सहावें. ६५ शिरले आणि कोठेंहि चांगलीशी जागा नाहीं, असें पाहून मोठ्याने ओरडून एका गृहस्थाला ह्मणाले, "अहो, तुमचें सामान खाली ठेवा. बाकावर सामान ठेवण्याचा हुकूम नाहीं. बाक बसण्यासाठी आहेत. " हैं ऐकून पांडुरंग हंसला आणि ह्मणाला, बाक बसण्यासाठी आहेत खरें; पण आमच्या मास्तरांनीं आझांला अनेक वेळां बाकावर उभें देखील केले आहे. " हे ऐकून अर्थातच डब्यांतली सगळी मंडळी हंसली. तितक्यांत एक पारशीशेट आंत शिरले आणि डब्यांतल्या सगळ्या मंडळीवर नजर 66 66 टाकून कांबळें पांघरलेल्या एका मराठ्याला ह्मणाले, सरक, जरा पली- कडे सरक, शाला ये लोकबी आतां मेलमधीं बसूं लागला.” तो मराठाहि कांहीं कमी वस्ताद नव्हता. तो ह्मणाला, “ सरकायासनी जागा हय कुठं ? अन् तुम्हीं तिकिटाचे पैसे दिलेत अन् आह्नीं काय चिचुकं दिलं व्हय? ह्मणे सरक सरक. अक्षी जसा गवरनर लागून गेलाय. एवढी मिजास करायची, तर साहेबाच्या डब्यामंधी जाऊन बसावं." पाटीलबोवांचे हे शब्द ऐकून पारशी शेट जरा नरम आले आणि बाकाच्या एका कोपऱ्यावर कसे तरी बसले. इतक्यांत गाडी सुटली आणि आतां डब्यांत अधिक गर्दी होत नाहीं, अशी प्रत्येकाला खात्री वाटू लागली. इतका वेळ प्रत्येकजण आपापलें बोजकें संभाळण्याच्या व सामानसुमान व्यवस्थित ठेवण्याच्याच गडबडींत होता; पण आतां तो उद्योग संपल्यामुळे एकमेकांचें निरीक्षण करण्यास व गप्पा मारण्यास सुरुवात झाली. 'आपणास कोठें जावयाचें ? आपण राहणारे कोठले ? आपण काय उद्योग करीत असतां ?' असल्या प्रश्नांनी प्रस्तावना करून गाडींतल्या गाडींत अगदीं दाट ओळख करून घेण्याचा पुष्कळ प्रवाशांचा क्रम असतो. कित्येक ही ओळख विडीनें अथवा पानतंबाखूच्या मदतीनेंहि करून घेतात. त्याप्रमाणे कित्येक प्रवा- शांनी या आमच्या पांच विद्यार्थ्यांचीहि ओळख करून घेण्याचा प्रयत्न केला. हे पांचहि तरुण मोकळ्या मनाचे, आनंदी वृत्तचे आणि निर्व्यसनी आहेत, हें पाहून त्यांच्यासंबंधानें पुष्कळांच्या मनांत आदर उत्पन्न झाला. विशेषतः चारदोन मराठे गृहस्थाबरोबरहि उच्चनीच भाव मनांत न आणता त्यांच्याशीं ते सलगीनें वागत आहेत, हे पाहून पुष्कळांना त्यांचे कौतुक