Jump to content

पान:सुखाचा शोध.pdf/५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५८ सुखाचा शोध. झाला आहे ? लक्षावधि गोरगरीब मजूरांना चहाच्या मळ्यांत कामकाज मिळून साऱ्यांना पोटभर अन्न मिळतें. " 66 दिनकर किंचित् उंच स्वरानें ह्मणाला, हा केवळ वस्तुस्थितीचा विपर्यास होय. आमच्या मजुरांना अन्न मिळावें ह्मणून चहाचे मळेवाले हा धंदा करीत नसून स्वतःचा खिसा गरम करावा म्हणून करतात. अर्थात् हा पैसा सात समुद्रांच्या पलीकडे जाऊन पडतो, हें डॉक्तरसाहेबांना सम- जावयास पाहिजे होतें. बरें, मजुरांना तरी मळ्यांत चांगल्या रीतीनें वाग विण्यांत येतें का ? मळ्यांत मजुरांचा जो राक्षसी छळ होतो, त्याचा विचार केला तर आम्ही चहा म्हणजे त्या मजुरांच्या शरीरांतले रक्त पितों, असेंच नव्हे का ? दयाशीलतेबद्दल ज्या हिंदुधर्मियांची प्रख्याति, ते आज अशा रीतीनें आपल्याच बांधवांच्या शरीरांतलें रक्त पिण्यासाठी उत्सुक व्हावेत, हा केवळ काळाचा महिमा ! " दिनकरचें हैं बोलणें संपल्यावर त्या दिवाणखान्यांत एक मिनीटभर विलक्षण स्तब्धता पसरली होती. नंतर वामनराव म्हणाले, डॉक्तर, तुमच्या ह्मणण्यापेक्षां मास्तरचेंच म्हणणें सयुक्तिक दिसतें. " डॉत्तर कांहीं बोलले नाहींत. त्यांनीं विशांतून एक चिरूट काढला आणि तो पेटवून धुराचे लोट सोडण्यास आरंभ केला. दिनकरहि कांहीं न बोलतां मुलांना घेऊन शिकविण्याच्या खोलींत गेला. मुलांचे शिकणें संपल्यावर मालतीने एक चोपडी दिनकरच्या हातांत दिली. ती म्हणाली, “ हें मीं मराठीचें इंग्रजीत भाषांतर केले आहे, तें कोठें कोठें चुकलें आहे, तें मला दाखवून द्या. " 66 त्या भाषांतरावर नजर टाकून दिनकर म्हणाला, " मी हें बरोबर घेऊन जातो आणि त्यांतल्या चुका उद्या तुम्हांला समजावून सांगेन. आजचें तुमचें गाणें मला खरोखर फार आवडलें, त्यांतले कांहीं शब्द अजूनहि माझ्या कानांत घुमत आहेत. " मालती हंसून म्हणाली, " आणि आपलें तें मघांचें चहाचें बोलणें जशाचें तसेंच अजून माझ्या कानांत प्रतिध्वनित होत आहे.” 66 पण तुम्हीं तर मला आज चहापिण्याची दीक्षा दिली. "