प्रकरण चवथें. ५३ " तें मला बाबांनी सांगितले. या संबंधानें आपली ते फार प्रशंसा ११ करतात. " वास्तविक यांत प्रशंसेसारखें कांहीं नाहीं. माझें कर्तव्य तेंच मी करीत आहे. " पण पुष्कळांना कर्तव्याची ओळख नसते. आपण आपल्या कर्त- व्याला जागतां, ह्मणूनच आपली प्रशंसा करावयाची." याच वेळीं भिंतीवर टांगलेल्या एका तजबिरीकडे दिनकरची नजर गेली. भोंवताली जाईच्या पानासह फुलांची वेलपत्ती असून मध्य- भागीं चार चरणाचा एक मराठी श्लोक विणकामानें तयार केलेला या तजबिरींत होता. त्या तजबिरीकडे बोट करून दिनकर ह्मणाला, " हें विण- काम मोठें नामी झाले आहे. हा श्लोक आपण स्वतः रचलेला वाटतें १ " दिनकरच्या या प्रश्नाला मालतीनें कांहींच उत्तर दिलें नाहीं. ती किंचित् लाजून स्तब्ध उभी राहिली. तेव्हां बसंत ह्मणाला, " तो माल- तीनेंच रचलेला श्लोक. तिनें पुष्कळ कविता केल्या आहेत. त्यांतल्या कांहीं मासिक पुस्तकांतून प्रसिद्धहि झाल्या आहेत. " दिनकर हंसून ह्मणाला, " हे मला माहितच नाहीं. मी काव्याचा मोठा भोक्ता आहे. आपल्या कविता मला पहावयाला मिळतील का ? " मालती कांहीं न बोलतां आंत गेली आणि तिनें 'राष्ट्रदीप' नांवाच्या मासिक पुस्तकाचे कांहीं अंक आणून दिनकराच्या होतीं दिलें. ती झणाली, 'माझ्या कवितेच्या खालीं मीं मालती ह्मणून सही केली आहे. माझ्या या कविता वाचून तुझी हंसाल मात्र. 66 ११. “ हंसणें हें आनंदाचें दृश्य स्वरूप होय. अर्थात् आपल्या कविता वाचून मला आनंद वाटेल असे दिसतें. बरें, येतों. नऊ वाजून गेले. " असें ह्मणून दिनकरानें मालतीचा निरोप घेतला आणि तो आपल्या बिहार्डी निघून गेला.
पान:सुखाचा शोध.pdf/५३
Appearance