Jump to content

पान:सुखाचा शोध.pdf/४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४९ प्रकरण सुवथें. पिना युरोपांतील तत्त्वदर्शीत्वाची ही ट्रेडमार्क मुंबईत प्रथम याच डॉक्टरसाहे- बांनी सुरू केली, असे कित्येकांचे म्हणणे आहे. कसेंहि असो, इतकें मात्र खरें कीं, व्यवस्थित पोशाकांत डॉक्तर असले म्हणजे ते कांहीं कुरूप दिसत नसत. उलट थोडे रुवाबदारच दिसत. ते मोठे वाक्पटु आणि विनोदी होते आणि या दोन हत्यारांनी ते आपला मार्ग वेळोवेळी निष्कं- टक करून घेत असत. त्यांचें प्रत्येक बाक्य इंग्रजी मराठी शब्दांच्या भेस- ळीचें असावयाचें, हें अगदीं ठरून गेलें होतें. निव्वळ मराठी बोलणें हैं त्यांना कमीपणाचें वाटे. डॉक्तरसाहेबांचा तो पोशाक व बोलण्याचाल- ण्याची ती ऐट पाहून दिनकरला साहजिक थोडें आश्चर्य वाटले. मोठ्या कौतुकानें डॉक्तरसाहेबांच्या मूर्तीचे तो निरीक्षण करीत असतां घरांत काम करणाऱ्या एका बाईनें मालतीच्या हातांत एक मोठी केटली आणून दिली आणि मालती सर्वांच्या पेल्यांतून चहा ओतूं लागली. सर्व पेले भरून झाल्यावर आपापला पेला उचलून प्रत्येकानें चहा पिण्यास आरंभ केला. चहावर एक फुंक मारून कमलाबाई ह्मणाल्या, माले, ( मालती या नांवाचें संक्षिप्त स्वरूप ) एक पेला चहा मास्तरांना दे. " मालती हळूच हंसून ह्मणाली, ते चहा घेत नाहींत. " 66 66 हैं ऐकून डॉ० निळकंठरावनीं चहाच्या बशीपासून आपले तोंड वर केले आणि ते म्हणाले, “ आपण चहा घेत नाहीं, हैं मोठे आश्चर्य म्हणा- वयाचें ! वास्तविक चहा हे मोठे उपकारी पेय आहे. सर्दी, पडसें, खोकला, थंडीताप यां रोगांचा जोर चहाने पुष्कळ कमी होतो. सकाळीं उठून एक पेला चहा पिणें हें खरावरच फायदेशीर आहे. श्रमानें आलेली ग्लानि दूर करण्यास तर चहासारखें दुसरें पेय नाहीं. " दिनकर नम्रपणे ह्मणाला, " आपले म्हणणें कदाचित् खरें असेल; पण मला चहा पिण्याचा अभ्यास नाहीं आणि औषध ह्मणून पिण्यासारखी माझी प्रकृतीहि नाजुक नाहीं. " असल्या सयुक्तिक उत्तरांनीं शांत बसण्याइतका डॉक्तरसाहेबांचा स्वभाव शिथिल नव्हता, ते ह्मणाले, " आपली शरीर प्रकृति अशी निकोप अस- ल्यास फार चांगलें. पण चहापानामुळे असले रोग शरीरावर केव्हांहि हल्ला