Jump to content

पान:सुखाचा शोध.pdf/३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सुखाचा शोध. 72 लक्ष्मी शालीनतेनें ह्मणाली, " तितकें मला येतें. दिनकरला मोठें आश्चर्य वाटलें. तिला मुळींच लिहिणेवाचणें येत नाहीं, अशी त्याची समजूत होती, आणि ह्मणून त्यानें अगर्दी लहान मुलांची पुस्तकें तिच्यासाठी आणलीं होतीं. तो ह्मणाला, घरांत सगळ्यांची समजूत तुला मुळींच लिहिणें वाचणें येत नाहीं, अशी आहे. त्यांना तूं हैं सांगितलें कां नाहींस ? " “ यांत सांगण्यासारखें काय आहे? अमुक येतें, तमुक येतें, असें सांगणे मला आवडत नाहीं. " “ हें फार चांगलें. पण तुला अधिक शिकावयाला पाहिजे. प्रपंचाचा भार बायकांवर असतो, तेव्हां खर्चाच्या काटकसरीसाठी त्यांना हिशोब- ठिशोब अवश्य ठेवतां आले पाहिजेत. " " हिशोबठिशोब ठेवण्याची मजवर पाळी आली, तर तेहि मी चांगले ठेवीन. " हें पहा, आतां तर दिनकर अधिकच निरुत्तर झाला. तो ह्मणाला, हल्लींचा काळ फार झपाट्याने बदलत आहे. बायकांना इंग्रजी देखील तेवढ्यासाठी फार चांगले आले पाहिजे. " " तें कशाला १ " 66 कशाला म्हणजे ! आतां इंग्रजीची जरूर अगदीं हरघडी पडते. " “अथवा ही जरूर आम्हींच आमच्या मूर्खपणामुळे उत्पन्न करून घेतली असेल. प्रत्येक व्यवहार मातृभाषेतच करावयाचा, असा लोकांनी जर निर्धार कायम ठेवला असतां, तर उगीच निष्कारण उठल्याबसल्या इंग्र जचि कारण उरलें नसतें. " सहज विद्युत चमकावी त्याप्रमाणें लक्ष्मीचे हे चमकलेले विचार पाहून निमिषमात्र दिनकरच्या डोळ्यापुढे लक्क झालें. क्षणभर स्तब्ध राहून तो म्हणाला, “ तें कांहीं असो, तुला माझ्यासाठी तरी इंग्रजी शिकावयाला पाहिजे. " " मी शिकेन; पण मी बुद्धीनें फार जड आहे. " “ कांहीं हरकत नाहीं. प्रयत्नानें सगळे कांहीं साध्य होतें. यानंतर "