Jump to content

पान:सुखाचा शोध.pdf/२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२२ सुखाचा शोध. •णाचे होते. विठ्ठलमंदिराची व्यवस्था ते फार चांगल्या प्रकारें ठेवीत व वाडव- 'डिलांनी घालून दिलेल्या नियमाप्रमाणे आल्या गेल्या आतिथअभ्यागताचा यथाशक्ति सत्कारहि करीत. पुष्कळ गांवच्या लोकांचा उमरावतीस जाण्याचा रस्ता रामपुरावरूनच असल्यामुळे त्यांच्या घरी पाहुण्यांची नेहमी गर्दी असे. घरांतील बायकामंडळींना यामुळे फार श्रम होत; पण त्याबद्दल त्यांनी कधीं कुरकुर न करतां त्या नेहमीं आनंदानें आल्यागेल्यांचा सत्कार करीत असत. या कारणामुळे विसूकाकांविषयी सर्वांच्या मनांत आदर वसत असे. याशिवाय ते लेखणीचे पक्के कारकून असून विद्वानहि होते, त्यांनी संस्कृ ताचा चांगला अभ्यास केलेला असून थोडेंस इंग्रजीहि त्यांना येत होतें. तसेंच ते फार भाविक होते. श्रीविठ्ठल मंदिराचे जे कांहीं वार्षिक उत्सव होते, ते उत्सव ते अत्यंत श्रद्धेने करीत. ते वारकरी सांप्रदायापैकी अस ल्यामुळे त्यांचे प्रेमळ भजन श्रीविठ्ठलापुढे नेहमींच होई; पण ते उत्कृष्ट कीर्तनहि करीत आणि पुराणहि फार चांगले सांगत. अशा अनेक कारणांमुळे विसूकाकांविषयी सर्वांच्या मनांत प्रेम बसत होते. त्यांच्या स्वतःच्या कुटुंबांत कधी तंटा बखेडा होत नसेच; पण तो गांवांर्ताह होता कामा नये असा त्यांचा वचक होता. उमरावतीच्या कचेरीत रामपूरचा दिवाणी किंवा फौजदारी कोणताहि तंटा नसावयाचा, असा विसूकाकांचा लौकिक होता. गरिबांविषयीं त्यांच्या अंतःकरणांत फार दया होती. कोणाचें दुखलें खुपले म्हणजे विसूकाका त्याच्या घरी हजर व्हावयाचे. केवळ औषधपाणीच नव्हे, तर रोग्याची सेवा करण्याची देखील त्यांची तयारी असावयाची. प्रसंगी महार आणि मुसलमान यांच्या सारख्या रोग्याजवळ जेव्हां या कर्मठ ब्राह्मणाची स्वारी दृष्टीस पड़े, तेव्हां पुष्कळांना आश्चर्य वाटे आणि कित्येकांचे डोळे अश्रूंनीं भरून येत. विसू- काकांचा हात अंगावर फिरला म्हणजे रोग्यासहि फार समाधान वाटत असे. अगदर्दी गरीबाच्या घरच्या लग्नकार्यासहि विसूकाका हजर अस वयाचे. एकंदरींत विसूकाका म्हणजे रामपूरच्या लोकांना देवाप्रमाणें पूज्य वाटत होते. हेच विसूकाका आमच्या दिनकरचे वडील होत. विसूकाकांचे वय