पान:सुखाचा शोध.pdf/२०५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भारत - गौरव ग्रंथमाला. -- - उद्देश व नियम सर्व महाराष्ट्रीयांच्या आदरास, अभिमानास व प्रशंसेस पात्र झालेली अशी साऱ्या महाराष्ट्रांत ही एकच ग्रंथमाला असून महाराष्ट्र वाङ्मयाची उत्कृष्ट सेवा ही ग्रंथमाला किती बाणेदार वृत्तीनें बजावीत आहे, हे वाङ्मयभक्तांना माही- तच आहे. इतकी लोकप्रिय ग्रंथमाला महाराष्ट्रांत दुसरी कोणतीहि नसून अन्य कोणत्याहि ग्रंथमालेपेक्षां या ग्रंथमालेचा प्रसार दुपटी तिपटीने अधिक आहे. आपण या ग्रंथमालेचे आश्रयदाते असालच. नसल्यास ताबडतोब पत्र पाठवून ग्रंथमालेचे आश्रयदाते व्हा. युरोपांतील महायुद्धामुळे छपाईच्या सर्व वस्तु फार महाग झाल्यानें ग्रंथमालेस अधिक लोकाश्रयाची फार आवश्यकता आहे. तरी आपण स्वतः ग्रंथमालेस आश्रय देऊन व आपल्या मित्रवर्गाचाहि जोडून देऊन महाराष्ट्र वाङ्मयाची सेवा अधिक उत्साहाने करण्यास आम्हास कार्यक्षम करा. महाराष्ट्र साहित्याची सर्वांगी सेवा करून सर्वोत्कृष्ट वाङ्मयाचा शक्य तितक्या कमी किंमतीनें प्रसार करणें, हा या ग्रंथमालेचा उद्देश आहे. नियमः – (१) आश्रयदात्यांत केव्हांहि नांव दाखल करता येते. पहिली व्ही. पी. नांव नोंदणावळ म्हणून चार आणे अधिक घेऊन पाठविली जाते. या व्ही. पी. चा स्वीकार झाल्यावर आश्रयदात्यांस ग्रंथमालेचें प्रसिद्ध होणारें प्रत्येक पुस्तक साध्या बांधणीचे दहा आण्यांच्या व्ही. पी. नें व कापडी बांध- णीचें पुस्तक एक रुपयाच्या व्ही. पी. ने पाठविण्यांत येतें. (२) आश्रयदा- त्यांत नांव दाखल करतांना मागील सर्व अथवा कांहीं पुस्तकें आश्रयदात्यांनीं घेतलींच पाहिजेत असें नाहीं; परंतु आश्रयदात्यांत नांव दाखल झाल्यावर प्रसिद्ध होणारे प्रत्येक पुस्तक आश्रयदात्यांनी घेतलेच पाहिजे. जीं पुस्तकें शिल्लक नाहींत ती देण्याची जबाबदारी ग्रंथमालेवर नाहीं. (३) साधारण दोन महिन्यांनीं एक पुस्तक प्रसिद्ध होतें. पुस्तक क्राऊन साईजचें, दोनशेवर • पानांचें व बहुतेक सचित्र असते. (४) पुस्तकें मागवितांना पुस्तकांची नांवें स्पष्ट लिहावीत, तसेच पत्ता वगैरे स्पष्ट असावा. (५) मागील पुस्तकांच्या किंमती वाढविल्या आहेत, तिकडे लक्ष्य द्यावें व मागील सर्व नियम रद्द समजावेत.