पान:सुखाचा शोध.pdf/२०३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण सोळावें. २०३ आहे, असे ती उमाजवळ ह्मणाली. आणि पांडुरंग, प्राणोत्क्रमणाच्या वेळीं “ त्यांना ह्मणावें मालतीबरोबर विवाह करून सुखी व्हा' असें ती ह्मणाली. पांडुरंग, सांग, आतां मी तिच्यासाठी कां रडूं नको ? " दिनकरची ही शोकविव्हल स्थिति पाहून पांडुरंगाचें अंतःकरण कळ- वळून आलें. दिनकरला आपल्या हृदयाशीं धरून तोहि रडूं लागला. खोलीच्या बाहेर चंद्रभागा उभी होती, तिचेहि डोळे भरून आले. थोडा वेळ स्तब्ध राहून दिनकर ह्मणाला, " पांडुरंग, माझ्या काल्पनिक सुखा- साठी जिने आनंदानें देह विसर्जन केला, शेवटच्या उछ्वासापर्यंत जिनें माझें कल्याण चिंतिलें आणि अशा रीतीनें जिनें आपले निस्सीम प्रेम प्रगट केलें, तिच्यावर मनुष्यत्वाचा केवळ आरोप आला होता. ती खरोखर देवता होती. पांडुरंग, तिचें जे माझ्यावर प्रेम होतें, तें खरें प्रेम. आध्यात्मिक प्रेम तें तेंच. तुला नाहीं तसें वाटत ? पांडुरंग, इतके दिवस झाले तें झालें. आतां मीहि याच प्रेमाची कास धरली आहे. मी आतां सगळ्या विश्वा वर प्रेम करणार आहे आणि अशा रीतीनें त्या हृदयदेवतेची गांठ घेण्याचा मी निश्चय केला आहे. " या नंतर दोघेहि थोडा वेळ स्तब्ध बसले होते. चंद्रभागा तितक्यांत पुढे होऊन ह्मणाली, " भावोजी, आंघोळीला पाणी दिले आहे. आतां चार आठ दिवस कांहीं मी येथून जाऊं देणार नाहीं. 66 चंद्रभागाला पाहतांच दिनकरचें हृदय पुन्हां भडभडून आलें, डोळे पुशीत पुशीत तो ह्मणाला, " वैनी, तुमच्या बहिणीला मी गमाविले म्हणून माझ्यावर रागावलां नाहींना ? 23 चंद्रभागा सद्गदित होऊन ह्मणाली, " भावोजी, आतां पुन्हां असे डोळ्यांना पाणी आणूं नका. तुम्ही आतां लहान कां आहां ? " आंघोळ करून दिनकरनें पांडुरंगाबरोबर जेवण उरकून घेतले आणि पांडुरंग कोर्टात गेल्यावर तो त्याच खोलींत कांहीं आध्यात्म विषयांचीं पुस्तकें वाचीत पडला. तीन चार वाजण्याच्या सुमारास चंद्रभागा पुन्हां खोलींत आली आणि ह्मणाली, " भावोजी, येथल्या मुलींच्या शाळेची मास्तरीण तुझांला भेटावयाला आली आहे. " चंद्रभागाच्या या