Jump to content

पान:सुखाचा शोध.pdf/२०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण सोळावें. २०१ हळू हळू दिनकर प्रसन्न दिसूं लागला. कोणत्याहि संकटांत त्याला आतां सुख दिसूं लागलें. इतकेच नव्हे, तर सगळें विश्व त्याला आनंदस्वरूप दिसूं लागलें. राग, लोभ, द्वेष यांची त्यास जाणीवच राहिली नाहीं. दिन- करची वृत्ति ही अशी पालटून तो आनंदी दिसूं लागला हें खरें; पण त्याचे सर्व आप्तस्वकीय मात्र खिन्न दिसूं लागले. दिनकरनें तिकडे लक्ष न देतां, हिमालयांत जाण्याची तयारी हळू हळू चालविली होती. एके दिवशीं सकाळी पांडुरंग आपल्या वकिलीच्या कचेरींत कोर्टाचें कामकाज पहात बसलेला असतां एकाएक दिनकर त्याच्यापुढे येऊन उभा राहिला. पांडुरंगानें प्रथम दिनकरला ओळखलेंच नाहीं. त्यानें बरेच दिवसांत हजामत न करविल्यामुळे दाढी वाढली होती. पायांत खडावा असून तो एक स्वच्छ धोतर नेसलेला होता. अंगावर एक पातळ धाबळी होती. अशा वेशांत दिनकरला त्याने ओळखले नसल्यास त्यांत पांडुरंगाचा मोठा दोष नाहीं. दिनकरला अशा स्थितीत पाहून पांडुरंगाला हंसूं आलें आणि दिनकरहि हंसला; पण तितक्यांत दोघांचींहि अंतःकरणें गहिंवरून येऊन दोघांनींहि एकमेकांस मिठ्या मारल्या. दोघांच्या डोळ्यांतूनहि अश्रु बाहू लागले. दिनकर सद्गदित होऊन म्हणाला, “पाडुरंग, मला एकाद्या एका बाजूच्या खोलींत घेऊन चल. तेथे आपण दोघेहि यथेच्छ रडूं." 66 पांडुरंग दिनकरला घेऊन एका बाजूच्या खोलींत गेला आणि तेथें ते दोन खुर्च्यावरून बसले. दिनकर म्हणाला, पांडुरंग, तुझा निरोप घेण्यासाठी आलो आहे. हा निरोप अखेरचाच म्हणावयाचा. त्या वेळची आपली सर्व मित्रमंडळी कोठें आहे, याची मला कांहींच माहिती नाहीं. तुम्हां सर्वांचे मी अनेक अपराध केले असतील, त्याबद्दल मी तुम्हां सर्वांची क्षमा मागतों. विशेषतः तुझ्या उपदेशाप्रमाणें न वागल्यामुळे मी माझ्या त्या गृहदेवतेला गमावून बसलों. पांडुरंग, प्राकृतिक सौंदर्याने नटलेल्या त्या पर्णकुटिर्केतल्या देवीचें महत्त्व मला आतां समजलें. " पांडुरंग म्हणाला, दिनकर, तूं बुद्धिवान् असून तुला सर्व कांहीं समजतें. शांत हो. सगळ्यावरच असे दुःखाचे प्रसंग येतात. " " पाडुरंग, तसा प्रसंग माझ्यावर आला असता, तर मींहि सोसला सु० शो०... १३