१८८ सुखाचा शोध. झाली होती. मालती उमरावतीस येऊन या नव्या परिस्थितीत तिचे कांही दिवस गेल्यावर तिच्या डोळ्यापुढे दिनकरची ती रम्य व मनोहर मूर्ति वारंवार दिसूं लागली. इतके दिवस ती दिनकर संबंधानें उदासीनच होती. त्याच्याविषयीं तिच्या मनांत बरा वाईट असा कोणताच विचार येत नसे; परंतु स्वतः तिच्या नवऱ्यानेंच जेव्हां दिनकरविषयीं तिच्यावर वाईट आरोप केला, तेव्हां दिनकरची वागणूक लोकांना संशय यावा अशा प्रकारची होती की काय ? याचा तिलाच संशय येऊं लागला, आणि त्या चमत्कारिक विचारामुळे तिचे मन दिनकरच्या रम्यतेकडे ओढ घेऊं लागले.. खरोखरच दिनकरचें आपणावर प्रेम असेल कां ? असा प्रश्न आतां दिवसां-- तून कितीतरी वेळां तिच्या मनांत उद्भवूं लागला. ' पण प्रेम असलें, तरी उपयोग काय ? मी विवाहित. तेहि विवाहित; तेव्हां त्यांचें माझ्यावर प्रेम असले काय किंवा माझें त्यांच्यावर असले काय, त्याचा उपयोग कांहींच नाहीं. ईश्वराच्या कृपेनें आह्मी दोघेंहि आवेवाहित असतांच जर तसा योगायोग घडून आला असतां, तर आज दोघेंहि सुखी असतो. जाऊं द्या. तें आतां माझ्या नशिवीं नाहीं आणि असल्या निकृष्ट प्रेमाचे विचारहि मनांत न येवो. प्रेम करण्यास माझ्या बंधुभगिनी, माझ्या विद्या- र्थिनी, माझा स्वदेश, वगैरे अनेक गोष्टी असतां आतां त्या भिकार प्रेमाचे विचार मनांत न आणणे हेच चांगले. ' अशा प्रकारचा निग्रह मालतीच्या मनांत उत्पन्न होऊन पाशविक प्रेमाविषयीं तिला पूर्ण तिरस्कार बाहूं लागला. तिचें मन जेव्हां इतकें खंबीर झालें, तेव्हां भवितव्यतेनें तिला अरी अगदी निराळ्या स्थितींत नेऊन टाकले होते. तरी ती त्या स्थितीतहि समाधानाने राहू लागली. उमरावतीस जेथे हैं मालतीचें कन्याविद्यालय होतें, तेथे जवळच एक लहानसा बंगला असून त्यांत एक वकील रहात होते. या वकिलाच्या स्त्रीचें नांव चंद्रभागाबाई असे होतें. चंद्रभागाबाईची सगळ्यांत वडील मुलगी पार्वती, या कन्या शाळेत जात असल्यामुळे आणि बंगला अगर्दी शाळेच्या जवळ असल्यामुळे मालतीची आणि चंद्रभागाबाईची थोड्याच दिवसांत दाट ओळख झाली होती. चार दोन दिवसांनीं मालती त्यांच्या
पान:सुखाचा शोध.pdf/१८८
Appearance