१८४ सुखाचा शोध. मुलीचीं चिन्हें बरीं दिसत नाहींत असे पाहून तीहि तेथेंच राहिली. आणखी तीन चार महिने गेल्यावर तर हिंडण्या फिरण्यासहि लक्ष्मीला शक्ति न राहून तिला आंथरूण धरावें लागले. ज्या दिवशीं तिनें आंथरूण धरलें, त्या दिवशी ती उमावैनीला ह्मणाली, " उमाताई, माझें एक काम आहे. कोणाला न सांगतां केले पाहिजे. " " उमा तिच्या अंगाबरून प्रेमानें हात फिरवून ह्मणाली, “लक्ष्मी, तुझें काम मी ऐकणार नाहीं, असें केव्हां तरी होईल का ? सांग सांग. लक्ष्मी कांहींसें लाजल्या सारखे करून ह्मणाली, त्या लहानशा कपाटांत एक फोटो आहे, तेवढा - " 66 लक्ष्मी पुढे कांहीं बोलणार त्याच्या आधीच उमा ह्मणाली, "समजलें. दिनकर भावोजींचा फोटो तुझ्या जवळ आणून ठेवावयाचा एवढेच ना तुझें काम ? " असें ह्मणून उमा उठली आणि तिनें लक्ष्मीचें कपाट उघडलें. पाहते तो आंत दिनकरचा फोटो व्यवस्थेनें ठेवलेला असून त्याला फुलांची माळ वातलेली होती. तेथील एकंदर स्वरूपावरून त्या फोटोला लक्ष्मीक डून दररोज सुवासिक फुलांची माळ वाहिली जात होती, हें उमाच्या लक्षांत आल्यावांचून राहिले नाहीं. लक्ष्मीच्या या आचरणामुळे उमाचें अंतःकरण साहजिक गहिवरून आले. तो फोटो घेऊन ती लक्ष्मी जवळ आली आणि लक्ष्मीच्या हातीं तो फोटो देऊन ती ह्मणाली, लक्ष्मी, भावोजींना खरोखर रत्न लाभले होते; पण त्यांनी तुला ओळखलें नाहीं. " 66 त्या फोटोला वंदन करून लक्ष्मी ह्मणाली, “ उमाताई, दोष त्यांचा नाहीं, दोष माझ्या नशीवावा. मला वेडी ह्मणा, खुळी ह्मणा; पण माझे. देवाधिदेव हेच. हातपाय चालले, तोंवर त्यांची वेडीवाकडी पूजा केली; पण आतां मानसपूजेवरच समाधान मानले पाहिजे. उमाताई, मला अक्षय दिसेल, अशा ठिकाणीं हा फोटो लावा. लक्ष्मीच्या या कृतीनें उमाच्या डोळ्यांतून सारखे अश्रू गळत होते. तिनें लक्ष्मीच्या समोरच्याच भिंतविर तो फोटो लावला. रोज सकाळी कोणाला नकळत फुलांची माळ करून ती तिनें लक्ष्मीला द्यावी आणि फ़ोटो तिच्या जवळ नेऊन ती लक्ष्मीनें फोटोला वाहिली कीं, पुन्हां "
पान:सुखाचा शोध.pdf/१८४
Appearance