१७८ सुखाचा शोध. मास्तरची आठवण झाली. त्यानें आपणास मुकुंदसंबंधानें पूर्वीच बजा- वलें होतें; परंतु त्या वेळी आपण दिनकरलाच दोष देऊन मुकुंदची माफी मागण्याविषयीं त्याला लिहिले होतें, याचीहि तिला त्याबरोबरच आठवण झाली. एक वेळ तिला वाटे दिनकरला पत्र पाठवून ही सर्व कहाणी त्याला कळवावी आणि त्याची सल्ला विचारावी; परंतु ज्या लेखणी- नें दिनकरला माफी मागण्यास लिहिले त्याच लेखणीनें आतां दिनकरला शरण जाणें तिला फार अनुचित वाटू लागले. अशा विचारांत तिचे चार दोन दिवस जातात न जातात तों दिनकरचेंच पत्र तिच्या हातीं पडलें. विलायतेहून आलेलें तें लांबलचक व मोठें थोरले पाकीट पाहून मालतीला साहजिकच आश्चर्य वाटलें. तिनें तें पाकीट फोडून त्यांतले कागद काढून प्रथम पत्र वाचण्यास आरंभ केला. " थोड्या दिवसांपूर्वी ब्यारिस्टर मुकुंद यांच्यासंबंधानें आपणास सावधगिरी बाळगण्याविषयी मी लिहिले होतें, परंतु त्यावेळी याचा आपणास राग येऊन मला त्यांची क्षमा माग- ण्याविषयीं लिहिले होतें. त्यांची क्षमा मागण्याची साधनें त्या वेळी माझ्या हातीं नसल्यामुळे आपली आज्ञा मला मोडावी लागली. आतां तीं साधनें माझ्या हातों आल्यामुळे आपण सांगाल त्या शब्दांनी ब्यारिस्टरसाहेबांची क्षमा मागण्याची माझी तयारी आहे. हीं साधनें कोणतीं, तें सोबतच्या कागदांवरून समजेलच." पत्र वाचीत असतां त्यांतलीं हीं पांच सहा वाक्ये जेव्हां मालतीनें वाचलीं, तेव्हां तिचे हृदय गहिवरून येऊन त्या एकांतांत ती मोकळ्या कठानें रडूं लागली. या पत्रामुळे पूर्वीच्या अनेक गोष्टींची स्मृति तिला झाली आणि डोळ्यापुढे त्या सर्व गोष्टी दिसूं लागल्याने तिच्या जीवाची तळमळ अधिक वाढली. रडून रडून हृदयावरील दुःखाचा भार कांहीसा कमी झाल्यावर पत्रासोबतचे कागदपत्र पाहण्यास मालतीने आरंभ केला. हे सर्व कागदपत्र लंडनच्या कोर्टाच्या सहीशिक्याचे होते. दारू विक्रीच्या दुका- नांत नौकरीस असलेल्या मिस मेरी स्मिथ नांवाच्या हलकट मुलीबरोबर मुकुंदनें लग्न करून नंतर या मिसेस मुकुंदचें व मुकुंदचें बिनसल्यामुळे कोर्टाने दरमहा पंधरा पौंड मेरी स्मिथला देण्याविषयी मुकुंदवर हुकुमनामा दिला होता. एका सभ्य स्त्रीशीं चावटपणा केल्याबद्दल मुकुंदला दोन
पान:सुखाचा शोध.pdf/१७८
Appearance