Jump to content

पान:सुखाचा शोध.pdf/१७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सुखाचा शोध. 66 संस्कृतीचे अनुकरण आहे. मद्यपानांत एवढा दोष नाहीं. अतिरिक्त मद्य- पान करणे हे मात्र दोषास्पद समजतात; तेव्हां आली आंबूस घाण तर • आली ! वास येणार नाहीं, इतक्या लांबून पतीबरोबर हंसले बोलले झणजे झालें. हें कांहीं मनाचें खरें समाधान नव्हतें, तरी अशा स्थितींतहि समा- धान मानून मालती चार आठ दिवस काढते न काढते, तोंच एके रात्रीं लाल डोळे करून मुकुंदची स्वारी डोलत डोलत घरांत शिरली. समोर मालतीला पाहून तो मोठ्यानें हंसला. नंतर 'वाल' नाचाप्रमाणे आपल्या तंगड्या उडवून ड्यान्स माय मेरी, किस् मी स्वीट " हें वाक्य इंग्रजी गाण्याच्या पद्धतीने वारवार ह्मणूं लागला. हा प्रकार पाहून मालतीची स्थिति वेड्यासारखी झाली. इकडे मुकुंद तर अगदीं तल्लीन झाला होता. तो मालतीजवळ जाऊन ह्मणाला, "Oh my love--my sweetest, dearest loveliest love my mary smith ! Are you Miss smith? Kiss me-kiss me miss! " ही मिस मेरी स्मिथ कोठून आली आणि ही आहे काय भानगड ? मालती तर या प्रकारानें विलक्षण उद्विग्न झाली. तिचे डोळे पाण्याने भरून आले आणि ती लहान मुलीप्रमाणे रडूं लागली. पण असें रडून रडून रडणार तरी किती ? तिनं शेवटीं धैर्य करून मुकुंदला धरलें आणि त्याला चिछान्यावर नेऊन निजविलें. मालतीहि न जेवतां तशीच निजून राहिली. मालती निजली खरी; पण तिची ती उद्विग्नता कांहीं केल्या दूर होईना. या विवाहानें आपण स्वर्गसुखापेक्षांहि रम्य अशा सुखाचा उपभोग घेऊं, अशी तिला फार आशा होती; पण या आशेवर विरजण पडून उलट सुखाऐवजी दुःखानें मात्र तिची पाठ पुर विली. अशा वेळी कोणाची तरी योग्य सल्ला मिळवावी असे कोणासहि साहजिक वाटतें. त्याप्रमाणे मालतीनें कांहीं मैत्रिणींना आपल्या घरीं चहा- साठी बोलावून आपली कहाणी त्यांना निवेदन केली. या आतां आपणास कांहीं तरी चांगली सल्ला देतील असे मालतीला वाटलें; पण आश्चर्य हैं कीं, प्रत्येकीनें आपलीहि तशोच दुःखद कहाणी सांगून मालतीला नुसती सहानभूति दर्शविली. एकीनें झटले, 'आमच्या येथेंहि असेच आहे.' तर दुसरी ह्मणाली, ' हें तरी बरें; पण आमच्या येथे तर त्या नादांत मला