Jump to content

पान:सुखाचा शोध.pdf/१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४ सुखाचा शोध. चालेल. स्वभावतःच जे मूकवृत्तीचे असतात त्यांच्या मनाची खळवळ विल- क्षण असते आणि या वेळी दिनकरच्या मनाची अवस्थाहि तशीच झाली होती. आपल्या स्वतःच्या लग्नाची कांहीं तरी बातमी आपल्या स्नेह्यांना समजली असावी आणि त्यामुळे ते आपली चेष्टा करीत आहेत, हे त्याच्या सहज लक्षांत आलें. अर्थात् अशा चेष्टेस मौन हेंच उत्तर होय, असें जाणून तो शांतवृत्तीने जेवत होता. विद्याथ्र्यांची मनें अधिकच खवळली. राम- भाऊ नांवाचा विद्यार्थी या सर्व नाटकाचा सूत्रधार असल्यामुळे त्याला तर हा बेरंग अर्थातच सहन झाला नाहीं. पांडुरंग नांवाच्या विद्यार्थ्याचा व दिनकरचा विशेष स्नेह असल्यामुळे रामभाऊ पांडुरंगाला म्हणाला, पांडोबा, अरे आज तुम्ही सर्वानी दिनकरचें एवढे आदरातिथ्य कां चालविले आहे ? ” 66 पांडुरंग गंभीरपणें ह्मणाला, सगळ्या विद्यार्थ्यांचे मिळून दिनकरला आज केळवण आहे. त्याचें लवकरच लग्न आहे." 26 रामभाऊ आश्चर्याने ह्मणाला, आं ! दिनकरचें लग्न ? कारे दिनकर, ही काय भानगड आहे ? "" " त्याला दिनकराची उत्तराची वाट न पाहतांच पांडुरंग ह्मणाला, कांहीं माहिती नसेल. त्याच्या वडिलांनी त्याचें लग्न ठरविले असून, त्या मजकुराचें पत्र आतांच आलें आहे." अशा रीतीनें विप्रयास आरंभ झाल्यावर या केळवणांत मधून मधून लहान मोठे हंसण्याचे फवारे उडूं लागले. दुसरा एक विद्यार्थी ह्मणाला, " लग्न ! आणि तें वाप ठरविणार ! नॉनसेन्स. अहो, या बालविवाहानें तर आमचा देश रसातळाला गेला. परकीयांच्या स्वाऱ्यांनी जे आमच्या देशाचें नुकसान झाले आहे, त्यापेक्षांहि अधिक नुकसान या बालविवाहानें झाले आहे. 66 66 रामभाऊ झणाला, तर या लहान मुली मोठ्या जबरदस्त असतात ह्मणावयाच्या. पण दिनकरची भावी पत्नी कांहीं अशी दहा बारा वर्षांची कुकुलीबाळ नसेल ? "" " अहो, मुलगी समजा मोठी असली, तरी लग्न ठरविणारा बाप कोण?"