पान:सुखाचा शोध.pdf/१३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण दहावें. १३३ बायकांचा जसा हा शुष्क वादविवाद चालला होता, त्याप्रमाणे पुरुपवर्गात- हि निरस गप्पा चालल्या होत्या. अजूनहि कांही मंडळी यावयाची अस ल्यामुळे त्यांच्या येण्यासंबंधानेंहि टीका होत होती. वामनरावांना या पार्टी- साठीं सपरिवार बोलावणे होते; परंतु आधीं न निघतां ते अगदी वेळेवर मालती, कमळाबाई, व मुळे यांसह येऊन दाखल झाले. त्यांना पाहतांच मिस्तर भार्गव यांनी मोठ्या सत्काराने त्यांना खुचींवर आणून वसविलें. कमळाबाई तशाच स्त्रीसमुहांत निघून गेल्या; पण मालती वामनरावांजवळ- च बसली होती. वामनराव खुर्चीवर वसल्यावर त्यांची ओळख मिस्तर भार्गव यांनी तेथील मंडळींना करून दिली. त्याबरोबर प्रोफेसर मंडपे त्यांच्याशीं करमर्दन करून ह्मणाले, " ओहो ! आपला परिचय झाला, याबद्दल फार संतोष वाटतो. आपले नांव यापूर्वीच 'सोशल रिव्ह्यू' नांवा- च्या मासिक पुस्तकावरून माहीत झाले होते. आज आपणास समक्ष पाहून फार आनंद झाला. त्या मासिकांत ' पौर्वात्य मनोभूमिकेवर पाश्चात्य संस्कृतीची लागवड ' या सदराखाली जे चार पांच लेख आपण प्रसिद्ध केले आहेत, त्याने आमच्या समाजावर पुष्कळ परिणाम होईल, असे मला वाटते." मिस्तर भार्गव आश्चर्याने म्हणाले, " ते लेख तुम्ही लिहिले आहेत ? वाः ! फार उत्तम. आपली लिहिण्याची पद्धत आणि विषय प्रतिपादन कर- ●ण्याची शैली हीं अगदी वाखाणण्यासारखी आहेत. इंग्रजी भाषेवर तर आपले चांगलेच प्रभुत्व आहे, इंग्रजीत आपण इतकें उत्कृष्ट लिहाल अशी माझी कल्पना नव्हती. " वामनराव शालिनता दर्शवून म्हणाले, " आपण माझे लेख इतक्या आदरानें वाचून पहातां, हें मी आपले मोठें भाग्य समजतों; माझी भाषा बगैरेहि चांगली असेल; पण माझे विचार आपणास कितपत पसंत पडले असतील, याची मला शंका आहे. " एक शहाणे गृहस्थ आराम खुर्चीवर बसून चिरूट ओढीत होते. त्यांना सरकारी नौकरी असून दोन अडीचशे रुपये पगार होता. त्यांचें नांव गोविंद- राव. जणूं झोपेतून उठून ते म्हणाले, “ यांनी त्या लेखांत काय असें लिहिले आहे ? "