१३० सुखाचा शोध. ब्यारिस्टर होऊन मुंबईस परत आली होती. आपले धाकटे बंधु इंग्लंडहून सुखरूप परत आले आणि त्यांची परीक्षाहि पास झाली या आनंदाप्रीत्यर्थ आज मधुसूदनरावांनी आपल्या मित्रांना व मुंबईतील सुधारकाग्रणी थोर थोर व्यक्तींना सहकुटुंब सहपरिवारें गार्डन पार्टीला बोलाविलें होतें. गार्डन पार्टीचा कार्यक्रम छापून तो निमंत्रण पत्रिकेसह सर्वाकडे पोहोचता कर- ण्यांत आला होता आणि त्या निमंत्रण पत्रिकेप्रमाणें महाराष्ट्रीय साहेब आपापल्या लेडींना बरोबर घेऊन रात्री नवाच्या सुमारास नटूनथटून दिल- खुष बागेत जात होते. इंग्लंडांत होणाऱ्या एकाद्या वड्या लार्डाच्या घरच्या गार्डन पार्टीची ही हुबेहुब नकल होती, एवढे सांगितलें म्हणजे या गार्डन पार्टीची कल्पना येईल. पाठींसाठी जमलेल्या सर्व पुरुषांचे पोषाख साहेबी थाटाचे असून स्त्रियांच्या पोपालांतहि पौर्वात्य गचाळपणाचा लेशहि नव्हता. पार्टीसाठी लागणाऱ्या सर्व खाद्यपेयादि वस्तूंचा मक्ता मुंबईतील प्रसिद्ध अशा मांगोनी ब्रदर्सला दिला होता. या गार्डन पाटीनें कांहीं विशेष हेतु साधावयाचे असा मधुसूदनरावांचा मुळींच उद्देश नव्हता; परंतु निमंत्रित मंडळींपैकी कित्येकांनी पाश्चात्य लोकांच्या पद्धतीप्रमाणे या पाठींची संधि साधून आपापलीं घोडीं पुढे दाम- टण्यास कमी केलें नाहीं. नुकत्याच गतभर्तृका झालेल्या श्रीमती भामिनी- बाई पांडे यांच्या हाती जेव्हां ही निमंत्रण पत्रिका पडली, तेव्हां त्यांना मोठा आनंद झाला. आपल्या सतरा अठरा वर्षे वयाच्या विमला नांवाच्या मुलीला हांक मारून त्या ह्मणाल्या, “ विमले, आज मिस्तर भार्गव यांच्याकडे रात्रीं गार्डन पार्टीला आपणां दोघांस निमंत्रण आहे. त्यांचे धाकटे बंधु विलायतेहून व्यारिस्टर होऊन आल्यामुळे ही पार्टी व्हावयाची आहे. हे बघ, पोषाक कसा अगदी नीटनेटका कर हो, आणि हे पहा, मिस्तर मुकुंदच्या वारंवार नजरेस पडण्याचा प्रयत्न कर. मधून मधून हंसावें, बोलावें, समजलीस ना ? " यावर हंसत हंसत बरें ह्मणून विमला आंत निघून गेली. एकंदरींत ही गार्डन पार्टीची संधी साधून कोशिप कशी करावी, याचाच धडा भामिनीबाईनी विमलेला दिला. विमला आतां ऐन तारुण्यांत होती; पण तिचा वर्ण काळासांवळा असून बांध्यानेंहि ती थोडी स्थूल होती.
पान:सुखाचा शोध.pdf/१३०
Appearance