पान:सुखाचा शोध.pdf/१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२ सुखाचा शोध. तर मग करील. ' तिसरा एक विद्यार्थी मध्येच तोंड खुपसून ह्मणाला, जो कित्येक नटांवर सुवर्णपदकांचा वर्षाव होतो, तो या दोन दुर्गुणांमुळे होतो, हैं उघड दिसतें, आणि ह्मणूनच मोठे मोठे लोक हीं पदकें देण्या- साठी धांवतात ! ' या विद्यार्थ्याला पुढे बोलूं न देतां एक विद्यार्थी चटकन् एका टेबलावर चढून एकाद्या बड्या वक्त्याप्रमाणें हावभाव करीत ह्मणाला,. 'सभ्य गृहस्थहो, आपल्या राष्ट्राच्या कल्याणासाठी, देशाच्या हितासाठी आणि समाजाच्या उन्नतीसाठी आपल्या महाराष्ट्रीय नाटक्यांनी या दोन दुर्गुणांचा संग्रह केला, याबद्दल आपण त्यांचे अभिनंदनच केले पाहिजे. व्याख्यान आणखीहि रंगास आले असते; पण तितक्यांत पोस्टाचा शिपाई पत्रे घेऊन आल्यामुळे हा विषय तितकाच राहिला आणि त्यामुळे नट- वर्गाची बरीच अब्रु वांचली. ( पोष्टाच्या शिपायाची आणि विद्यार्थ्यांची बरीच गट्टी जमली होती. तो पत्रे घेऊन आला म्हणजे सर्व विद्यार्थ्याची त्याच्यावर टोळधाड पडे. आजहि तो आंत शिरतांच सर्व विद्याथ्र्यांनी त्याच्यावर हल्ला चढविला. पोष्टाच्या शिपायानेंहि ही आपत्ति टाळण्याची युक्ति योजून ठेवलेली होती. तो सगळ्यांची पत्रे दाराच्या आंत फेंकून चटकन् चालता होई. या क्रमा- प्रमाणें आजहि त्यानें आंत पत्रे टाकतांच एका विद्यार्थ्यानें बुभुक्षित याचका- प्रमाणे ती घाईनें उचलून घेतली आणि पोष्टाच्या शिपायाचें बाकीचें काम तोच करूं लागला. ' रामचंद्र नारायण देशपांडे ' पांडुरंग सदाशिव भावे ' वगैरे नांवें तो मोठ्याने बांचूं लागला व एकेक विद्यार्थी पुढे येऊन आपले आपले पत्र घेऊं लागला. ज्यांना घरून पत्र आले नाहीं, ते अर्था- तच थोडे हिरमुसले झाले. जे विद्यार्थी बाहेर भटकावयाला गेले होते, त्यांची पत्रे त्या विद्यार्थ्यानें टेबलावर ठेवलीं. इतक्यांत एका विद्यार्थ्याने टेबलावरचें एक पत्र पाहून मोठ्याने हसण्यास सुरुवात केली. अर्थात सगळे विद्यार्थी त्याच्याभोवती गोळा झाले आणि " कायरे रामभाऊ, एवढा हंसतोस का ? " ह्मणून त्याला विचारू लागले. तो पुन्हा हंसून ह्मणाला, “ दिनकर विश्वंभर देशमुख यांच्या पत्रांतला मजकूर वाचून मला हसू आले. त्याचे वडील लिहितात, ‘ येत्या उन्हाळ्याच्या सुटीत तुझें