पान:सुखाचा शोध.pdf/११७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण आठवें. १.१७ निरोप घेतला. उद्यांपासून रोजच्याप्रमाणे शिकविण्यास येण्याविषयीं मालती- नें दिनकर जात असतां त्याला विनंति केली आणि दिनकरनेंहि पण हंसत हंसत त्या ह्मणण्यास संमति दर्शविली. दिनकर त्या दिवशीं कांहींसा खिन्न- तेनेंच त्या बंगल्यांत शिरला होता; पण जाते वेळीं तो कल्पनेच्या बाहेर आनंदित होऊन विन्हाडाकडे चालला होता. लक्ष्मीच्या विचाराचा व तिच्या प्रतिमेचा जो एक परिणाम दिनकरच्या अंतःकरणावर झाला होता; त्यामुळे मालतीची भेट घेण्याचा प्रयत्न करणे ह्मणजे अन्याय करणे होय, असे त्याला वाटू लागले होतें. अशी त्याच्या मनाची चमत्कारिक स्थिति झाल्यामुळे मालतीच्या बंगल्यांत शिरतांना तो साहजिक अस्वस्थ झाला होता. परंतु त्याचा बंगल्यांत प्रवेश झाल्यावर ज्या कांहीं गोष्ठी क्रमाक्रमानें घडल्या, त्यामुळे त्याच्या हृदयावर अधिष्ठित झालेली लक्ष्मीची मूर्ति हळू हळू पुसट होऊन दिसेनाशी झाली आणि त्याच हृदयसिंहासनावर मालतीची मूर्ति अधिष्ठित झालेली त्याला दिसली. आतां त्याचें अंतःकरण मालती- मय होऊन गेलें आणि विशेषतः मालतीकडून मिळालेल्या त्या घड्याळा- च्या देणगीमुळे तर त्याला सर्वत्र मालतीचें तें रम्य चित्र दिसूं लागलें. तेथून परततांना 'उच्चां शिकवायला यालना ? असा प्रश्न जेव्हां मालतीनें त्याला हंसून मुरडून केला, तेव्हां दिनकरच्या अंतःकरणांतल्या खोल भाग एक आशेचा बारीक तंतु उत्पन्न झाला आणि त्या आशेच्या भरांत तो त्याच्या बिऱ्हाडीं येऊन पोहोचला. दुसरा दिवस केव्हां उजडतो आणि मागच्याप्रमाणे मुलांना शिकवावयाला केव्हां जातो, असें दिनकर ला मालतीच्या निमंत्रणामुळे झाले होतें. तसंच ते बक्षीस मिळालेले घड्याळ आपल्या स्नेह्यांना केव्हां दाखवीन असेंहि दिनकरला झाले होतें. त्या रात्री त्याची पांडुरंगशिवाय इतरांशीं गांठच पडली नाहीं; परंतु एक प्रकारें फक्त पांडुरंगाची भेट झाली, हेंहि त्याला फायद्याचें वाटले. पांडु- रंगाचा आणि त्याचा स्नेह इतरांपेक्षा अधिक असल्यामुळे बक्षिसाचें रहस्य त्याच्याशिवाय इतरांना सांगण्यासहि तो तयार नव्हता. पांडुरंगाची गांठ पडून लवकरच मुद्याच्या वादविवादास सुरुवात झाली. तें सोन्याचे घड्याळ हातांत घेऊन पाहून पांडुरंग ह्मणाला, तुझा प्रेमरथ प्रणयपथावरून १५