प्रकरण आठवें. तुझी पूर्ण कराल असा भरंवसा आहे. तुझांला एक वस्तु नजर करण्याचें मी योजिलें आहे. वस्तु कांहीं फार किंमतीची आहे, असें नाहीं; परंतु ती देण्याचा हेतु लक्षांत ठेवून ती वस्तु आदरानें जवळ बाळगल्यास मला फार आनंद वाटेल. " असे ह्मणून वामनरावांनीं ती लाल रंगाची पेटी उपडून तींतून एक सुमारे शंभर रुपये किंमतीचें सोन्याचें घड्याळ बाहेर काढले आणि तें मालतीच्या हाती देऊन ते तिला ह्मणाले, " मालू, मास्तरना दे. " 66 मालतीनें तें घड्याळ घेतले आणि सहास्यपणे; पण मोठ्या मार्दवानें दिनकरच्या हातांत देऊन ती लाल रंगाची पेटीहि त्याच्या पुढे ठेवली. दिनकरनेंहि मोठ्या शालिनतेनें त्या घड्याळाचा स्वीकार केला. ते घड्याळ मालतीच्या हाताने मिळाल्यामुळे त्याला मनापासून आनंद झाला होता आणि या सत्कारामुळे त्याचें हृदय साहजिक गहिंवरून आले होतें. भरून आलेल्या कंठानें तो हणाला, आपला व आपल्या एकंदर मंडळीचा सजवर जो लोभ आहे, त्याचें दर्शक ह्मणून ही वस्तु मी मोठ्या आदरानें जवळ बाळगीन. काळाची एकेक घटका हे घड्याळ जशी दाखदाखवील त्याप्रमाणे आपणा उभयतांत प्रेमवृद्धि होत आहे, हेंहि हें घड्याळ माझ्या प्रत्यहीं दृष्टोतत्तीस आणून देईल, अशी मला आशा आहे. माझें चारित्र्य दिवसें दिवस अधिक उज्ज्वल करण्यासाठी या घड्याळाचा उपयोग होवो असा मी परमेश्वराजवळ आशीर्वाद मागतो. आपण आदरपूर्वक दिलेले हे घड्याळ आपणास जरी अल्प किंमतीचें वाटत असले, तरी तें मी अमूल्य समजून नेहमीं जवळ बाळगीन." डॉक्कर व कमलाबाई या दोघांना हा सगळाच प्रकार मोठासा आवडला असे दिसलें नाहीं. आपल्या अल्पाकाच्या काळ्या कोटाच्या खिशांत ते घड्याळ जितकें मुरेख दिसलें असतें, तितकें कांहीं तें दिनकरच्या खिशांत चांगले दिसणार नाहीं, असें देखील डॉक्तरांना वाटले; पण तशी सूचना मात्र त्यांनी केली नाहीं. चेहऱ्यावरील ती खिन्नता कोणाच्या दृष्टीस पडूं नये ह्मणून त्यांनीं रुमालाने दोन तीन वेळां तोंड पुसून जोरानें चिरूट ओढण्यासहि आरंभ केला.
पान:सुखाचा शोध.pdf/११५
Appearance