पान:सुखाचा शोध.pdf/१०९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण आहे. १०९ minim " आणि इकडे आज आलां ? " 66 'काय करणार ! उद्योगामुळे फावलेंच नाहीं. माझ्या धाकट्या बंधूची कॉलेजची वगैरे व्यवस्था लावून मी आज मोकळा झालो." डॉक्तरसाहेब इतका वेळ कमळाबाई शेजारच्या खुर्चीवर बसूनच बोलत होते. ते दिनकरला पाहण्याबरोबर उठणार होते; पण तसे केले असतां दिनकरला अधिक संशय येईल, या विचारानें थोडा वेळ ते तसेच बसून राहिले. पायानें ठोकरतांच फुटबॉल जसा उंच उडतो, त्याप्रमाणे लोक- लजेच्या भयाची लाथ असह्य होऊन फुटबॉलरूपी डॉक्तरसाहेबाह खुर्ची- वरून उठले आणि चला, बाहेरच्या दिवाणखान्यांत बसूं' असें ह्मणून दिनकरसह बाहेर येऊन बसले. हे दोघे त्या दिवाणखान्यांत येऊन बसले तों, बाहेरून वामनरावहि मुलांसह आंत आले. वामनरावांना पाहतांच दिनकरनें त्यांना नमस्कार केला. त्यांनीहि आनंद दर्शवून दिनकरला प्रति- नमस्कार केला. मदन आणि वसंत या दोघांना तर दिनकरला पाहून फारच आनंद झाला. त्या दोघांनीहि आपलीं मस्तकें दिनकरच्या पायावर ठेवलीं. दिनकरचें हृदय या वेळी साहजिक गहिवरून आले व त्यानें • दोघांनाहि उचलून कुरवाळले. हा प्रकार पाहून डॉक्कर मोठ्याने हंसले. ते झणाले, "गुरुशिष्य दोघेहि अथोडाक्स दिसतात.” 66 'आपल्या गुरूसंबंधानें पूज्यभाव व्यक्त करणे, हेहि तुझांला हास्या- स्पद वाटतें ?" असें ह्मणून वामनराव खाली बसले आणि आपल्या जव ळच्या खुर्चीवर बसण्याविषयी त्यानी दिनकरला सुचविलें, मालती इतका वेळ उभी राहून हळूच हंसून दिनकरकडे टकमकां पहात होती. दिनकर बसल्यावर तिनेंहि टेबलाच्या पलीकडे असलेल्या खुर्चीवर बसून 'तुमची प्रकृति वगैरे ठीक आहेना?' असा दिनकरला प्रश्न केला. दिनकरनेहि तितक्याच मार्दवानें 'होय' ह्मणून उत्तर दिलें, दिनकरला आणखी चार दोन औपचारिक प्रश्न केल्यावर वामनराव ह्मणाले, भुसावळच्या स्टेशनावरील तुमच्या त्या बाणेदार व योग्य साहसाची हकीकत वर्तमान- पत्रांत वांचून पाहिल्यावर मला फार आनंद वाटला आणि तुमच्यासंबंधानें फार अभिमान उत्पन्न झाला. त्या दिवशीं मला जे चार दोन सभ्य गृहस्थ 66