पान:सुखाचा शोध.pdf/१०७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण आठवें. १०७ विटू गड्याच्या बाजूनेंच बंगल्यांत जाऊं लागला. विदू गड्यांत आणि • त्याच्यांत थोड़ें अंतर राहिल्यावर विठ्ने 'रामराम रावसाहेब ' असे म्हणून एक लांबलचक रामराम केला. दिनकरनेंहि हंसून त्याला परत रामराम केला. खरारा करण्याचें तसेंच टाकून विटू म्हणाला, मास्तर, चक्षीस ? " 66 " कसले बक्षीस ?” “ शेट सांगत होते कीं, मास्तरची मोठी परीक्षा पास झाली; आणि त्या परिक्षेत मास्तरचा पहिला नंबर आला. " बरें, उद्यां देईन. वामनराव आहेत का घरांत ? “ नाहीं. ते मुलांना बरोबर घेऊन बाहेर हिंडावयाला गेले आहेत. मालती घरांत आहे कीं नाहीं, असें विदूला विचारण्याचें दिनकरच्या अगदी मनांत आले होते, परंतु या प्रश्नानें आपल्या हृदयाचा क्षुद्र भाव विठूला कळेल, अशी शंका मनांत येऊन दिनकरनें तो प्रश्न विकूला केला नाहीं. यापूर्वी हा प्रश्न त्यानें विठूला किती तरी वेळां केला होता; पण आज त्याला ही अशी विचित्र शंका आली. दिनकर तसाच तेथून निघाला आणि एकेक पावलानें बंगल्याकडे चालू लागला. मुख्य दरवाजाला टेकून बंड्या नांवाच्या कुत्र्याची स्वारी दोन्ही पाय पसरून त्यावर तोंड ठेवून स्वस्थ बसली होती. त्यानेंहि मास्तरला ओळखले आणि शेपूट हालवून आपला आनंद व्यक्त केला. मुख्य दिवाणखान्यांत साधारण उजेड होता; पण बाजूच्या खोल्यांची दारें खिडक्या बंद असल्यामुळे त्यांत अंधारच दिसत होता. दिनकरनें इकडे तिकडे बरीच नजर पुरविली; पण बंगल्यांत कोणीच असल्याचे त्याला दिसेना. इतक्यांत एका खोलींत एक मोठी छाया हल- तांना त्याला दिसली. त्याबरोबर तेथें कोणी तरी असावें असे त्याला वाटले. तो दोन पावलें आणखी पुढे गेला, तेव्हां समोर दिसत • लेल्या छायेवरून तेथे कोण असावें, याचा दिनकरला कांहींच तर्क अस करतां येईना. वास्तविक ही फुटबॉलप्रमाणे वाटोळे गरगरीत अगोदरच डॉक्तरसाहेबांचा वर्ण " छाया म्हणजे दुसरें कोणी नसून असलेले डॉक्टर नीलकंठराव होत. म्हणजे ' कीं कृष्णवर्ण नटला जणु 6