पान:सुखाचा शोध.pdf/१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१० सुखाचा शोध. हां हां म्हणतां आज त्या गोष्टीस सतरा अठरा वर्षे होऊन गेलीं. त्या वेळीं या चाळीवर फक्त विद्यार्थ्यांसाठी असा जणूं काय शिक्काच मारला होता. शिवाय चाळीतल्या वऱ्याच खोल्या विद्यार्थ्यांनी अडविल्यामुळे इत- रांना तेथे येऊन राहण्यास थोडा संकोच वाटे. चाळीच्या मालकांनाहि भाडोत्री या दृष्टीने हे कॉलेजांतील विद्यार्थी विशेष पसंत होते. विद्यार्थ्यांना जागा भाड्यानें दिल्यामुळे आपण एक प्रकारें विद्यादानास मदतच करीत आहों, अशी त्या मालकाची कोण समजूत करून दिली होती. यांत कितपत तथ्यांश असेल तो असो; पण एवढें खरें कीं, विद्यार्थ्यांवांचून या चाळीत सहसा कोणी राहण्यास येत नसे आणि आलाच तर विद्यार्थ्यांच्या स्वछंदी वर्तनामुळे कंटाळून या चाळीला लवकरच रामराम करीत असे. वेळची हो हकीकत लिहित आहों, त्या वेळी एकंदर अठरा वीस विद्यार्थी या चाळीत भाडेकरी ह्मणून असून ते सर्व मनमिळाऊ व एकमेकांविषयीं कळकळ बाळगणारे असे होते. त्यांत कोणी देशावरून तर कोणी कोंकणां- तून तर कोणी नागपूर - उमरावतीकडून देखील आलेले होते. बहुतेक विद्यार्थी दक्षिणी ब्राह्मणवर्गापैकी असून त्यांतले बरेच कायदा व वैद्यक विषयाचा अभ्यास करणारे होते, व कांहीं थोडे विद्यार्थी दुसन्याहि विष- याचा अभ्यास करणारे होते. या चाळींत विद्यार्थ्यांनी कसा प्रवेश केला असेल तो असो; पण एक दोन करता करतां जेव्हां पंधरा वीस विद्यार्थी ज्या तेथें एकत्र झाले, तेव्हां सर्व विद्यार्थ्यांनी थोडी दूर दृष्टि पुरवून जेवण्या- साठी खाणावळींत न जातां त्यांनी स्वयंपाकी वगैरे ठेवून चाळींतच जेव- णाची व्यवस्था केली. या दूरदृष्टीमुळे खर्च कमी येईल असे विद्यार्थ्यांना वाटत होते; परंतु राजशालकाप्रमाणें सरदारी थाटाचें जेवण झोडण्याचा परिपाठ पडल्यामुळे अर्थातच हा खर्च खाणावळीपेक्षां अधिक येऊ लागला. आला तर आला, त्यांत काय मोठेसें ! घरीं बापावर हुंडी पाठविली कीं, पैसे पटत असल्यामुळे विद्यार्थ्यांनी या जास्त खर्चाची मोठीशी पर्वा केली नाहीं. कित्येक विद्यार्थ्यांना हा खर्च थोडा डोईजड होई, पण अशा विद्यार्थ्यांना बाकीचे विद्यार्थी संभाळून घेत असत. एके दिवशी सायंकाळच्या सुमारास कांहीं विद्यार्थी इकडे तिकडे भट-