पान:सार्थ प्राकृत प्रकाश.pdf/6

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

जशी साम्ये लक्षात येतात तशीच, किंबहुना त्यापेक्षा जास्त, भिन्नता लक्षात भरते. सुरूवातच मुळी हा फरक दाखविते. एका अरण्यात यज्ञविधी करून, मंत्र म्हणून कंटाळलेल्या ऋषींना महाभारतकथा सांगितलेली आहे. सांगणारा सूत आहे. त्याला पौराणिक आणि मुनी म्हटले आहे. वंशपरंपरा इतिहास सांगण्याचा त्याचा धंदा होता. त्याच्या बापाचे नाव होते 'लोमहर्षण', म्हणजे 'रोमांचकारी कथा सांगणारा'. प्रत्यक्ष सांगणा-याचे नाव 'उग्रश्रवस्'; म्हणजे 'मोठ्या आवाजाचा' असे होते. कथा चित्तथरारक असावी व सांगणा-याचा आवाज खणखणीत, मोठा असावा, अशी अपेक्षा होती. कथा सांगावयास वीरासन घालून बसत होते की काय, माहीत नाही. पण कथेचा थाट ऐकला, म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील पोवाड्यांची आठवण होते. अगदी ह्याउलट रामायणकथेचा आरंभ आहे. वाल्मीकीने कथा रचिल्यावर ती दोन गायकांना शिकविली. त्यांचे नाव 'कुशीलव'. हे तरुण होते; देखणे होते. गाण्याचे त्यांना ज्ञान होते; तालाचेही ज्ञान होते. कदाचित नृत्यही त्यांना माहीत असावे. दोघेजण अयोध्येच्या रस्त्यांतून गात-गात फिरत असताना भरताने त्यांना पाहिले व ऐकिले आणि रामाकडे आणिले. त्यांनी रामायण गायला सुरूवात केली. रामायण ही एक रम्यकथा होती. महाभारताप्रमाणे एका राजवंशाचा चार पिढ्यांचा इतिहास नव्हता. रस्त्याने गायकांनी कथा गात जावे, त्यांना कुणीतरी घरी बोलवावे, किंवा रस्त्यात एखाद्या चौकात उभे राहून त्यांनी कथा मांडावी, भोवती लोक जमावे, हा प्रकार कथा सांगण्याच्या बाबतीत आता शहरांतून दिसत नाही. पण अगदी तेराव्या शतकापर्यंत अशा त-हेचे गायक. असत. हे आपल्याला 'उत्तराध्ययन' सूत्रावरील टीकेमध्ये चित्त आणि संभूत ह्या दोन भावांची जी कथा सांगितली आहे, तीवरून दिसून येते. हा गायनप्रकार पोवाडा नव्हे; लावणीवजा व तमाशावजाही नव्हे; तर पोवाड्यापेक्षा, लळित व लावणी यांपेक्षा भारदस्त असे एक लोकरंजनाचे साधन होते, असे दिसते. ह्या गीताचे गायक कुशीलव म्हणजे कुश आणि लव असे सीतेचे दोन मुलगे होते, असे रामायणात सांगितले आहे. पण 'कुशीलव' हा एक स्वतंत्र ।। संस्कृती ।।