पान:सार्थ प्राकृत प्रकाश.pdf/35

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पन्नासएक श्लोक, राज्यात सर्व कसे काय चालले आहे असे 'कच्चिद्' शब्दाने सुरुवात होणारे प्रश्न विचारतो. हे प्रश्न महाभारतावरून घेतले असावेत, असा संपादकाचा तर्क आहे. महाभारतात प्रश्न प्रसंगानुरूप आहेत. येथे मात्र सर्वस्वी अप्रासंगिक आहेत. पण ह्या असल्या प्रश्नांची एक काव्यपद्धती निर्माण झाली. राजाने ऋषींना असे प्रश्न रघुवंशात व शाकुंतलात विचारिले आहेत. कालिदासापुढे महाभारताचा नव्हे, पण रामायणाचा कित्ता होता. हा सबंध अध्याय निरर्थक व अप्रासंगिक आहे. दशरथ मेलेला रामाला माहीत नाही. भरताला यौवराज्याभिषेक झाला, हे तो धरून चालतो आहे. राज्य सोडून रामाला जेमतेम महिना झाला होता. अशा वेळी राज्याचे कुशल विचारिल्याबरोबर जणू आपल्या शिरावरच सर्व भार पडला आहे, अशा त-हेने "लोक नीट वागतात ना? मुले बापाची आज्ञा पाळतात ना? पाऊस नीट पडतो ना? (वैशाख संपल्यावर!)? परिस्थिती ठीक आहे ना?" विचारिलेले हे सर्व प्रश्न अगदी अप्रासंगिक वाटतात. . राम विचारायचा थांबून भरताला उसंत मिळाल्यावर भरताने पितमरणाची हकीकत सांगितली; रामाने शोक केला; वन्यफलांचा पिंड देऊन पितृकार्य केले व मग भरताने त्याला परत ण्याची विनंती केली. राम म्हणतो, "राज्य तुझे आहे." भरत म्हणाला, "बरे, तसे का होईना. मी ते तुला देत आहे." तरी राम ऐकेना. भरताने फार चांगला युक्तिवाद केला; थोडी हेटाळणी केली; क्व चारण्यं क्व च क्षात्रं क्व जटाः क्व च पालनम् । ईदशं व्याहतं कर्म न भवान् कर्तुमर्हती ।। (२.९८.५६). "अरण्य कोठे व तुझा क्षात्रधर्म कुठे? कसल्या जंटा आणि कसले प्रातज्ञापालन? हे असलं काही तुम्हांला शोभत नाही." ह्या संबंधात रामाने एक फारच चमत्कारिक व आतापर्यंत व पुढे कोठेही रामायणात न आलेली गोष्ट सांगितली. तो म्हणतो, “भाऊ.पूर्वी आपल्या पित्याने जेव्हा तुझ्या आईशी लग्न केले, तेव्हा हुंडा म्हणून राज्य देण्याचे तुझ्या आईच्या वडिलांना कबूल केले होते. पुरा भ्रातः पिता नः स मातरं ते समुद्वहन्! ।। संस्कृती ।।