पान:सार्थ प्राकृत प्रकाश.pdf/28

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पडले होते तेथे तो त्यांना घेऊन गेला. दोघेही पुत्र-शोकाने मेले व 'तूही असाच मरशील,' असा शाप पित्याने दशरथाला दिला. श्रावण आई-बापांना कावडीत घालून काशीला नेत होता, असे वर्णन मराठी गाण्यातून आहे. तसा काही प्रकार नव्हता. आई-बाप अति वृद्ध, सर्व काही त्यांचे तोंड धुण्यापासून जेवू घालण्यापर्यंत मुलगाच करी, अशी हकीकत आहे. कालिदासाने ही कथा देताना दशरथाचे लग्न झाले होते व मूल होत नव्हते, अशा वेळी त्याच्या हातून तो तरूण मारला गेला व म्हाता-यांचा शाप म्हणजे पुत्रप्राप्तीचा वरच असे तो समजला, असे वर्णन केले आहे. रामकथा व रामायणकाव्य है मागाहूनच्या कवींचा एक खजिना होता. त्यातून ज्याला पाहिजे ते तो घेत होता. त्यात फेरबदल करीत होता. कालिदासाने जे केले, तेच भवभूतीन केले. प्रत्यक्ष प्रसंग नाही, तर वर्णने व निरनिराळ्या साहित्यिक लकबी मागाहूनच्या कवींनी व नाटककारांनी रामायणातून कशा उचलल्या, हे वाचताना जागोजाग प्रत्ययाला येते. मुलगा वनवासात गेल्यापासून दशरथ कौसल्येच्या महालात अर्धवट भ्रमात निजलेला होता. तरूण मुलाला मारल्याची गोष्ट कधीतरी मध्यरात्री त्याने कौसल्येला सांगितली व तो निजला असला पाहिजे. त्या वेळीही "मला तू दिसत नाहीस. तुझा स्पर्श जाणवत नाही" वगैरे म्हणालाच. सकाळी मागध व बंदिजन त्याला उठवावयास आले. तेव्हा तो मेलेला आढळला. ही बातमी कौसल्या सुमित्रेला व नंतर इतरांना कळली. म्हणज राजाच्या प्राणांतिक अवस्थेत त्याच्याजवळ कोणीही नव्हते. दशरथ मेल्याचे कळल्यावर वसिष्ठ व मंत्री येऊन त्यांनी ताबडताब भरताला आणण्याची व्यवस्था केली व मुलगा येऊन अग्नी देईपर्यंत राजाच शरीर नीट रहावे, म्हणून ते एका तेलाच्या हौदात ठेविले. भरताचे आजा गिरिव्रज होते. पुढे जरासंधाने प्रसिद्धीला आणिलेले मगधातील गिरिव्रज नव्हे. हे गिरिव्रज विपाश् (बियास) नदीच्या काठी मोठमोठ्या डोगरा हिमालयाजवळ वसलेले होते. हस्तिनापूर, कुरूजाङ्गल ओलांडून उत्तर थेट सध्या ज्याला 'कुलू' म्हणतात तेथल्या प्रदेशापर्यंत जावे लागे. अयान ।। संस्कृती ।। २६