पान:सार्थ प्राकृत प्रकाश.pdf/11

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पिढीजाद राजधानी. सर्व भांडण होते ते त्या राज्याबद्दलच होते. काही शतकांनी हस्तिनापुरावर काही संकट कोसळले व त्या वेळच्या कुरूराजाला राजधानी सोडून जावे लागले. त्याने कौशांबी ही आपली राजधानी केली. अयोध्या हीसुद्धा इक्ष्वाकूची पिढीजाद राजधानी होती. मनूपासून कित्येक मोठमोठ्या राजांनी तेथे राज्य केलेले होते. ही परंपरागत राजधानी रामानंतर नष्ट झाली. एवढेच नव्हे, तर पूर्वी कधी न ऐकिलेल्या 'साकेत' अशा नवीनच नावाने ती ओळखू जाऊ लागली. राम, लक्ष्मण, भरत व शत्रुघ्न ह्यांच्या मुलांनी निरनिराळ्या ठिकाणी राज्ये स्थापिली, असा वृत्तांत आहे. रामाची मुले बापाच्या गादीवर का बसली नाहीत? रामाच्या मागे अयोध्या ओस पडली होती, असे वर्णन आहे. रामाच्याबरोबर सर्व प्रजाजन स्वर्गात गेले, म्हणून अशी अवस्था झाली का? हे वर्णन प्रक्षिप्त वाटते. पण अयोध्या ओस पडली आणि तिच्याऐवजी 'साकेत' हे एक नवीनच शहर उदयाला आले. एवढे मात्र खरे दिसते. पण त्याचे कारण मात्र कोठेही रामायणात व इतरत्र दिलेले आढळत नाही. रामाने आपल्या जिवंतपणीच आपल्या मुलांना दुसरीकडे राज्ये दिली, असे वर्णन आहे. असे का? हेही कोडेच आहे. कृष्णाची द्वारका कृष्णाबरोबर गेली. कृष्णाखेरीज दुस-या कोणाचे नाव द्वारकशा निगडीत नाही. तसे अयोध्येचे नाही. अतिशय पराक्रमी, पुण्यवान अशा वंशाची ती राजधानी होती. ती नाहीशी का झाली? कशी झाली? हा एक शोध घेण्यासारखा प्रश्न आहे. महाभारताचे नुसते कथासूत्रच एक आहे असे नव्हे, तर स्वभावदशनहा अशा त-हेचे आहे की, त्यामुळे गोष्टीला एक विशिष्ट दिशा मिळते. दोन मुल थोरला अंधळा म्हणून बाजूला ठेविलेला. धाकट्याला गादी मिळाली. पण तो ती उपभोगू शकला नाही. थोरल्याचे व धाकट्याचे मुलगे एकाच राजवाड्यात त्याच वडील माणसांच्या हाताखाली राजपुत्र म्हणून वाळल. सामाजिक व कौटुंबिक परिस्थितीने ती चुलत-भावंडे एकमेकांची स्पधक होती. त्या भावंडांचे व त्यांच्या बरोबरीच्या मित्रमंडळींचे, नातेवाइकाच प . वडील मंडळींचेही स्वभाव, स्पर्धा शिगेला पोहोचावी असेच होते. कथला । संस्कृती ।।