पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/२५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२३० सार्थ श्रीज्ञानेश्वरी कवि पुराणमनुशासितारमणोरणीयां समनुस्मरेद्यः । सर्वस्य धातारमचिन्त्यरूपमादित्यवर्णं तमसः परस्तात् ॥ ९ ॥ प्रयाणकाले मनसा चलेन भक्त्या युक्तो योगबलेन चैव । ध्रुवोर्मध्ये प्राणमावेश्य सम्यक् स तं परं पुरुषमुपैति दिव्यम् ॥ १० ॥ सम० - पुराण सर्वज्ञ फळप्रदाला । स्मरेल जो सूक्ष्म अतींद्वियाला ॥ अतर्क्य रूप धरि विश्वजाळा । सूर्य प्रकाशूनि तमीं निराळा ॥ ९ ॥ प्राणप्रयाणीं मन आवरूनी । मद्भक्तिर्ने योगबळेकरूनी ॥ प्रार्णे निजभृयुगचक्र भेदी । पावे स्वदिव्या पुरुषा अनादी ॥ १० ॥ आर्या - तमसः पर रवितेजा अचिंत्य धाता कवी अणून अणूं । शास्ता पुराण मी मज चिंतुनि दे जो मना दुर्जे न अणूं ॥ ९ ॥ दिव्य परम पुरुषाला अचळमनें योगभक्ति साधूनी । पावे प्रयाणकाळीं भ्रूमध्ये प्राण तोचि रोधूनी ॥ १० ॥ ओव्या - कवि आणि पुराण । लोकशिक्षा करी जाण । सर्वउत्पत्तिकारण । सूक्ष्माहूनि सूक्ष्म ॥ ९ ॥ ऐसा जो अंतकाळीं । मन निश्चल करी ते वेळीं । भक्तियोगें तो बळी प्राणें भ्रुकुटी भेदी, परम पुरुषातें पावे ॥ १० ॥ जयाचें आकारावीण असणें । जया जन्म ना निमणें । जें आघवेंचि आघवेपणें । देखत असे ॥ ८६ ॥ जें गगनाहून जुनें । जें परमाणुहूनि सार्ने । जयाचेनि सन्निधानें । विश्व चळे ॥ ८७ ॥ जें सर्वांतें यया विये । विश्व सर्व जेणें जिये । हेतु जया विहे । अचिंत्य जें ॥ ८८ ॥ देखे वोळंबा इंगळु न चरे । तेजीं तिमिर न शिरे । जें दिहाचें आंधारें । चर्मचक्षूसी ॥ ८९ ॥ सुसडा सूर्यकणांच्या राशी । जो नित्य उदो ज्ञानियांसी । अस्तमानाचें जयासी | आडनांव नाहीं ॥ ९० ॥ तया अव्यंगवाया ब्रह्मातें । प्रयाणकाले प्राप्ते । जो स्थिरावलेनि चित्तें । जाणोनि स्मरे ॥ ९१ ॥ बाहेरी पद्मासन रचुनी | उत्तराभिमुख बैसोनि । जीवीं सुख सूनि । क्रमयोगाचें ॥ ९२ ॥ आंतु मीनलेनि मनोधर्मै। स्वरूपप्राप्तीचेनि प्रेमें। आपेंआप संभ्रमें | मिळावया ॥९३॥ जें निराकार असतें, ज्याला जन्ममरण नसतें, जे सर्वसाक्षी आहे, ८६ जें आकाशाहूनही प्राचीन आहे, जें परमाणूपेक्षांही लहान आहे, ज्याच्या सहवासानें विश्वाला चेतना मिळते, ८७ जें या सर्व दृश्याला प्रसवतें, ज्यामुळें हें विश्व जगतें, हेतु म्हणजे कार्यकारणसंबंध ज्याच्या वाऱ्याला उभा राहात नाहीं, जें कल्पनेपलीकडचें आहे, ८८ जशी वाळवी अग्नींत प्रवेशूं शकत नाहीं, किंवा तेजांत अंधाराचा रिघाव होत नाहीं, तसें जें भर दिवसासही या चर्मचक्षूंना अंधाराप्रमाणें अदृश्य राहातें, ८९ जें सडून निर्मळ केलेल्या सूर्यरूपी कण्यांची राशी आहे, आणि ज्ञानिजनांना जें नेहमीच उदय पावलेले असून ज्याला अस्तमानाचा शब्द लक्षणेनंही लावतां येत नाहीं ; ९० त्या निर्दोष व परिपूर्ण स्वरूपाच्या ब्रह्माला जो मरणकाळीं शांतचित्ताने जाणून आठवतो; ९१ या बाह्य देहाने 'पद्म' नांवाचे योगासन घालून आणि उत्तर दिशेस तोंड करून बसून, कर्मयोगाचे शाश्वत सुख आपल्या जीवभावांत ठसवून, ९२ आंतल्याआत एकवटलेल्या मनाच्या शक्तीनें आणि ब्रह्मस्वरूपप्राप्तीच्या आवडीनें, अत्यंत त्वरेनें आत्मस्वरूपास मिळण्यासाठीं, ९३