पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/२५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२२८ सार्थ श्रीज्ञानेश्वरी कां उबारेनें वस्त्र फेडिलें । तरी सांग पां काय मोडलें । अवेवामाजीं ।। ६६ ।। तैसा आकार हा आहाच भ्रंशे । वांचूनि वस्तु ते सांचलीचि असे । तो बुद्धि जालिया विमुकुसे । कैसेनि आतां ॥ ६७ ॥ म्हणोनि यापरी मातें । अंतकाळीं जाणत सांते । जे मोकलिती देहातें । ते मीचि होती ॥ ६८ ॥ यं यं वापि स्मरन्भावं त्यजत्यन्ते कलेवरम् । तं तमेवैति कौन्तेय सदा तद्भावभावितः ॥ ६ ॥ सम० - जें जें आणिकही रूप स्मरतां देह जो स्यजी । तें तेंचि पावे स्मरण रंगला ज्यांचिया सदा ॥ ६ ॥ आर्या - लावी कलेवरातें ज्या ज्या भावासि पांडवा स्मरुनी । त्या त्या भावा पावे चित ते भावना सदा धरुनी ॥ ६ ॥ ओवी - ज्या ज्या भावें स्मरतां । होय देह त्यजिता । त्यातें पावे कुंतीसुता । सदा तद्भाव म्हणोनियां ॥ ६ ॥ हवीं तरी साधारण | उरीं आदळलिया मरण । जो आठव धरी अंतःकरण । तेंचि होइजे ॥ ६९ ॥ जैसा कवण एक काकुळती । पळतां पवनगती । दुपाउलीं अवचितीं । कुहामाजी पडियेला ॥ ७० ॥ आतां तया पडणयाआरौतें । पडण चुकवावया परौतें । नाहीं म्हणोनि तेथें । पडावेंचि पडे ॥ ७१ ॥ तेंवि मृत्यूचेनि अवसरें एकें । जें येऊनि जीवासमोर ठाके । तें होणें मग न चुके । भलतयापरी ।। ७२ ।। आणि जागता जंव असिजे । तंव जेणें ध्यानें भावना भाविजे । डोळां लागतखेवों देखिजे । तेंचि स्वप्नीं ॥ ७३ ॥ तेविं जितेनि अवसरें । जें आवडोनि जीवीं उरे । तेंचि मरणाचिये मेरे | फार हों लागे ॥ ७४ ॥ आणि मरणीं जया जें आठवे । तो तेचि गतीतें तस्मात्सर्वेषु कालेषु मामनुस्मर युध्य च । मय्यर्पितमनोबुद्धिर्मामेवैष्यस्य संशयम् ॥ ७ ॥ सम० — तस्मात् तूं सर्वदा मार्ते स्मर हैं युद्धही करीं । समर्पितां बुद्धि मन मज मातेंचि पावसी ॥ ७ ॥ आर्या - यास्तव सर्वा काळ स्मर मज परि तूं करीं अर्धी युद्ध । पावसि निश्चित मातें मजला मन बुद्धि अर्पुनी शुद्ध ॥७॥ ओवी — यास्तव मज सर्वकाळ उच्चारीं । मज स्मरोनियां युद्ध करीं । माझे ठायीं मनबुद्धि दृढ धरीं । तेणें मज पावसी निश्चित किंवा उकाड्यामुळे आपल्या अंगावरचें वस्त्र काढून टाकावें लागलें, तर त्यानें अवयवांची कांहीं मोडतोड होते काय ? ६६ त्याचप्रमाणें नामरूपात्मक देहही नाश पावतें, परंतु ब्रह्म ही सद्वस्तु त्या देहादिकांवांचूनच स्वस्वरूपानें जशीच्या तशीच राहाते. मग जी बुद्धि या ब्रह्मस्वरूपाशीं समरस होऊन ब्रह्मच बनली, ती कशी बरें विसकटून जाईल ? ६७ म्हणून, या प्रकारें जे मला देहावसानाच्या वेळी जाणत असतांना देहाला सोडून जातात, ते मद्रूप होतात. ६८ सामान्यतः असा नियम आहे, कीं मृत्युवेळा आली असतां जीव अंतःकरणांत जे आठवतो, तेंच तो होतो. ६९ जसा एखादा भीतिग्रस्त होऊन वायुवेगाने पळत असतां अवचित आडांत पढावा ७० आणि त्या पडण्यापूर्वी त्याला सांवरण्याला पलीकडे कोणीच नसल्यामुळें, पडल्याशिवाय त्याला दुसरें गत्यंतरच नसावें, ७१ त्याचप्रमाणें मरणाची वेळ येऊन ठाकली म्हणजे जीवासमोर जी कल्पना उभी असेल त्या कल्पनेच्या रूपाशीं मिळून जाण्याचे त्याला कोणत्याही उपायाने टाळतांच येत नाहीं. ७२ आणि जागेपणीं जीवाला ज्या गोष्टीचा ध्यास लागला असेल, तीच गोष्ट डोळा लागतांक्षणीं त्याला स्वप्नांत दिसूं लागते. ७३ त्याप्रमाणेंच जिवंत असतांना ज्याविषयींची जीवाची हौस पुरली नसेल त्याबद्दलचे प्रेम मरणाच्या सीमेवर फारच वृद्धिंगत होतें. ७४ आणि असा नियम आहे, कीं, मरतांना ज्याचें स्मरण होतें, त्याच्याच जन्माला