पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

涼涼照號 मोरोपंतकृत श्रीमद्भगवद्गीतास्तुति श्रीमद्भगवद्गीते ! वर्णावं आदरें तुला नमुनी । सर्वोपनिषत्सारे माते ! तुज पाहती तुला न मुनी ॥ १ ॥ तुज सोडुनि तरि तरते, अन्याचे जीव जरि उपासक ते, । त्यजुनि अमृत, लंघाया मृतितं, सेवूनि जरि तुपा सकते. ॥ २ ॥ भगवद्गीते ! ज्ञात्या अधिका तुजहुनि सुधानदी नाहीं; । त्वद्भक्ता तापांहीं भय, जेंवि दिजं बुधा न दीनांहीं ॥ ३ ॥ तुज भजत्या, संसारीं वसतां गतिलाभ होय जो, गीते ! । त्यासि न पात्र भ्रमति, श्रमति व्यर्थचि तपोनि, जोगी ते ॥ ४॥ संवुनि सुधाहि, तापति कामक्रोधार्त सतत रोगी ते; । संसारी, प्राशुनि तुज, हा रामतनूज नत तरो, गीते ! ॥ ५ ॥ जय मोहमहिषमर्दिनि ! जय भगवति गेयगुरुगुणे गीते ! । जरि झाली नसतीस प्रकटा तूं, यतिहि बहु भवा भीते. ॥ ६ ॥ तव सचिव द्वैपायनशंकरमधुसूदनादि योगी ते, । ज्ञानेश प्रतिनिधि, हें वर्णन तुझिया, मनास यो, गीते ! ॥ ७ ॥ युवराज तुझा वामन, वाम न मानू, तुवांचि मानावें; । गुरु लघु कविंनीं प्रभु नित्य यथामति विशंक वानावें ॥ ८ ॥ भगवति ! शुचिकीर्ति तुझी सुमति ज्ञानेश्वरी प्रिया आली । झाली विश्वख्याता, हे कार्या बहु जनाचिया आली. ॥ ९ ॥ नेती तिकडे जासी, भगवति ! बहुमत इचं तुला उक्त. ! ज्ञानेश्वरीस जन अनुसरले, त्यांसि करिसि तूं मुक्त ! ॥ १० ॥ श्रीमद्भगवद्गीत! नियमं जो करितसे तुझा पाठ, । तारिसि तया तयाच्या घेउनि कामादि शत्रुंची पाठ ॥ ११ ॥ त्यात मुक्ति वरि, तुझे, गीते ! अध्याय पाठ अठरा ज्या, । लोकपति त्यजुनि जशी ती दमयंती, करूनि हठ, राजा ॥ १२ ॥ एकचि अध्याय पुरे, किंबहुना श्लोक एक, हा नियम. । गीत ! त्वदाश्रितजनीं तिळहि करिल न बहुमानहानि यम. ॥ १३ ॥ पद, अघ हरुनि जलधिवें, असुर मथुनि, शंभुचें उदार पण, । हृतभवभीत गीत ! अत्यंताद्भुत तुझं उदारपण ॥ १४ ॥ साधनसंपत्तिपरा झाल्या तुज नम्रकंधरा आर्या । भावं समर्पिल्या या तव चरणीं नमुनि पंधरा आर्या ॥ १५ ॥ CHCHACHER: : ::::::::::::::::::::HA