पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/२८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२०२ तेव्हां तेव्हां तृतीया विभक्ति घालतात. " दिवा " व" पृथव्या " ही तृतीया आहे. " दिवा परः " व "पृथिव्या परः" ह्यांच्यापुढे " वर्तमाना" हें अध्याहृत आहे. . एना पृथिव्या पर: अस्याः पृथिव्याः परस्तार, त्या पृथिवीच्या पलीकडे. यावापृथिव्योरुपादानं उपलक्षणं एतदुपलक्षितात् सर्वस्मात् विक:रजातात् परस्तात् इत्यर्थः, एतावती संबभूव= सर्वजगदात्मना अहं संभूतास्मि एतच्छब्देन उक्तं सर्वे परामृश्यते. एतत्परिणामं अस्याः एतावती. मराठी अर्थ - सर्व भूत जातांना (विश्वा भुवनानि ) उत्पन्न करणारी ( आरभमाणा ) जी मी ती वायूप्रमाणे [ अन्य कोणाचाही मदत नसून ] स्वतःच ( अहमेव ) [ कोणत्याही कार्याला ] प्रवृत्त होतें ( प्रवामि ). आका शाच्या पलीकडे ( दिवा पर: ) [व] ह्या पृथिविच्याही पलीकडे ( एना पृथिव्या परः) [ ह्म० ह्यांनीं उपलक्षित अशा सर्व कार्यसमुदायाच्याही पलीकडे असणारी, असंग, उदासीन व कूटस्थ अशा ब्रह्मात्मक जी ] मी ती आपल्या महिम्यानें ही अशी झालें आहे ( एतावती संबभूव ) ह्म० ह्या विश्वरूपाने नटलें आहें. ऋचा १ ली:- वातस्य = वायो.. नु= क्षिप्रं. मंडल १० सूक्त १६८. ( पीटर० नं० ३४ ) महिमार्ग=माहात्म्यं. ह्यापुढे “ प्रब्रवीमि " हैं क्रियापद अध्याहृत आहे.