पान:साथ (Sath).pdf/154

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

ठाऊक, तिचं असं करणं ज्योतीच्या मनाला लागलं. तिनं पुन्हा स्मितासाठी काही खाऊ नेला नाही. स्मिताचं जेवण कधी धड नसे. वेळ झाला तर थोडाफार स्वैपाक करायचा, नाहीतर काय असेल ते शिळंपाकं खायचं. कधी नुसती लोणच्याशी पोळी खायची तर कधी दोन केळी खाऊन दूध प्यायचं. ज्योती तिच्याबद्दल काळजी न करण्याचा प्रयत्न करायची.
 खोलीवर राहायला गेल्यापासून स्मिताचं येणंजाणं खूप कमी झालं. एकदा बऱ्याच दिवसांनी ती आलेली पाहुन राम म्हणाला, " वाः ! आज पुष्कळ दिवसांनी घराची आठवण झाली!"
  " डॅडी, आता हे माझं घर नाही, मला माझं स्वतःचं दुसर घर आहे."
 " मग हे काय आहे ? तुला नको असलेली अडगळ ठेवण्यासाठी गुदाम ? हे जर तुझं घर नसलं तर तुझ्या सगळ्या वस्तू इथ कशासाठी पडल्यायत?"
 " मी नेईन त्या इथनं."
 ज्योतीनं नंतर तिची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, पण ती तिच्या सगळ्या वस्तू घेऊन गेलीच. तिचे नेहमीच्या वापरात नसलेले कपडे , पुस्तकं, कुणाकुणाकडून बक्षिसादाखल मिळालेल्या वस्तू, खोलीत फार जागा नाही म्हणून ठेवलेलं काही सामान सगळं काही घेऊन गेली. आणि तिच्या नेहमीच्या खाक्याप्रमाणे ज्योती आणि राम घरी नसताना ती आली. ऑफिसमधून परत आल्यावर जणू आपल्या जीवनातून स्मिताचं अस्तित्व पुसल गेल्यासारखं ज्योतीला वाटलं.
 तरी पण स्मितानं आईबापाशी जवळजवळ संपूर्णपणे संबध तोडून टाकले ते ह्यानंतर नव्हे, तर वाढदिवसाच्या पार्टीला कृष्णमूर्तीला बोलवायचं की नाही ह्या वादानंतर. कृष्णमूर्ती पत्रकार होता, आणि रामने कसल्यातरी समारंभाच्या निमित्तान बोलावलेल्या पत्रकारांच्यातून ज्योतीला तो एकदम आवडला होता. त्या वर्षी तिनं त्याला मुलांच्या वाढदिवसाला बोलावलं होत. दोन्ही मुलांचे वाढदिवस ती नाताळच्या सुट्टीत घरी असताना

१४६ : साथ