पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी कै. सौ. इंदूमती रामकृष्ण टिळक ही माझी जननी. कै. रामकृष्ण वासुदेव टिळक हे माझे जनक. हे मातापिता मला पूजनीय आहेतच पण ज्या कृष्णाकाठच्या रम्य सांगलीत माझा जन्म झाला ती सांगली नगरी एखाद्या तीर्थक्षेत्रासारखी मला पूज्य आहे सांगली माझी जन्मभूमि आहे. याचा मला अभिमान आहे. असे म्हणतात की, 'जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी . ' जननी आणि जन्मभूमिच्या ऋणातून मुक्त होण्याचा अल्पसा प्रयत्न म्हणून सांगली नगरीविषयी लिहिलेले हे पुस्तक कृतज्ञतापूर्वक त्या सर्वांना अर्पण !