पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/२५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वगळा' म्हटले तर ही तारांगणे क्षणात हतप्रभ होतील. आकाशवाणी, दूरदर्शन, केबल वाहिन्या ठप्प होतील. थोडक्यात अंधारच अंधार. इतकं सामर्थ्य या मंगेशक मुठीत आहे. सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेचे महापौर श्री. सुरेश पाटील यानी या पाचही गुणवंत मंगेशकर भावंडांना एकत्रितपणे सांगलीत आणण्याचा दुर्मिळ योग साधला आणि त्या सर्वांचा मा. दीनानाथ यांच्या शताब्दि महोत्सवानिमित्ताने २६ फेब्रुवारी २००० रोजी महापालिकेतर्फे मानपत्र देऊन त्यांचा भव्य नागरी सत्कार केला. तीन दिवस भरगच्च कार्यक्रम केले. सांगली आणि मंगेशकर हे संबंध त्यामुळे आता अधिकच दृढ झाले आहेत. सांगलीकरांचे गौरवगान करावे तेवढे थोडेच. पण प्रत्येक मैफलीची अखेर भैरवीनी करावीच लागते त्याप्रमाणे कर्तृत्वान सांगलीकरांची ही गौरवगान मैफल मंगेशकर कुटुंबियांच्या गुणगौरवाने करुन ही मैफल मी येथेच थांबवितो. 000 सांगली आणि सांगलीकर. २२५