पान:सांगलीचे शिल्पकार वसंतदादा पाटील.pdf/४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मनोगत...  माझ्या ‘सांगली आणि सांगलीकर' पुस्तकातील कै. वसंतदादा पाटील यांच्यावरील लेख प्रयत्न प्रकाशनचे त्रिलोकनाथ जोशी यांच्या वाचनात आला. तेव्हा त्यांनी, मी वसंतदादांचे छोटेखानी चरित्र लिहावे, असा प्रस्ताव मांडला.
 विशेषतः किशोरवयीन मुलांना असे एखादे वसंतदादांचे कार्यकर्तव्य ठळकपणे, पण थोडक्यात सांगणाऱ्या चरित्राची प्रकाशकांना अपेक्षा होती. त्यानुसार माझ्याकडे असणाऱ्या वृत्तपत्रीय कात्रणांचा आणि उपरोक्त चरित्रामधील माहितीच्या आधारे 'सांगलीचे शिल्पकार वसंतदादा पाटील' हे चरित्र मी तयार केले आहे.
 वसंतदादांविषयी जेवढं सांगावं तेवढं थोडं असं त्यांचं प्रचंड कर्तृत्व आहे. ते व्यक्त करणे अवघडच. तथापि केलेला प्रयत्न संबंधितांच्या अपेक्षा पूर्ण करील, अशी आशा वाटते.

-अविनाश टिळक