पान:सयाजीराव - चारित्र्यवान, निर्व्यसनी सार्वभौम राजा.pdf/६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सयाजीराव एक चारित्र्यवान,
निर्व्यसनी सार्वभौम राजा


छत्रपती शाहू महाराजांच्या काळात थोरल्या बाजीरावांच्या मराठी सेनेने दिल्लीपर्यंत धडक मारली होती. त्यावेळी मराठ्यांचे सेनापती खंडेराव दाभाडे यांनी गुजरातेतील मोगलांना थेट काठीवाडपर्यंत मागे रेटण्याचे शौर्य गाजविले. तेव्हा त्यांच्यासोबत दमाजीराव गायकवाड हे मराठी सरदार होते. ते पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील भरे गावचे. पुढे ते खेड तालुक्यातील दावडी गावी आले. नंदाजी त्यांचा मूळ पुरुष. ते भोर संस्थानात किल्लेदार होते. राक्षसभुवनच्या लढाईत इ.स. १७२० साली मराठ्यांनी निजामाचा पराभव केला. मराठी सेनेसोबत नंदाजीचा नातू दमाजी गायकवाडही होते. दमाजीची बहादुरी बघून शाहू महाराजांनी दमाजीस समशेर बहादूर किताब दिला. यानंतर खंडेराव दाभाडे या मराठी सेनापतींनी गुजरातेतील मोगलांना काठेवाडपर्यंत मागे रेटण्याचे शौर्य गाजविले. त्यावेळी त्यांच्यासोबत होते दमाजीराव गायकवाडांचा मुलगा पिलाजी.

पिलाजीरावाने मोगलाकडील सोनगड इ.स. १७२० मध्ये

सयाजीराव एक चारित्र्यवान, निर्व्यसनी सार्वभौम राजा / ६