पान:सयाजीराव गायकवाड - धर्मविषयक विचार.pdf/१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
गझल



लाभो अम्हा तुकोबा शेजार निंदकांचे;
दारापुढे असावे ते दार निंदकांचे !


किरकोळ - थोर कोणी, आहे लहान-मोठा,
देवा किती घडवले आकार निंदकांचे !


टीका करून त्यांनी आम्हास शुद्ध केले;
मानू हजार वेळा आभार निंदकांचे !


मिळतात ठोक येथे साबत तऱ्हेतऱ्हेचे
दुनियेस स्वच्छ करती बाजार निंदकांचे !


ज्ञानेश्वरास छळती, पिळतात जे तुक्याला;
पाहून घ्या विठोबा अवतार निंदकांचे !


स्वर्गास थेट नेते त्यांची विमानसेवा;
झाले अनंत कोटी उपकार निंदकांचे !
सयाजीराव गायकवाड धर्म विषयक विचार / १९