Jump to content

पान:सयाजीराव गायकवाड - धर्मविषयक विचार.pdf/११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



 १९३३ च्या जागतिक धर्म परिषदेत सयाजीराव स्पष्ट म्हणाले, ईश्वर ही मुळात मनुष्यनिर्मित संकल्पना असून तो लोकसत्ताक राज्यातल्या राजासारखा गरिबांचा कैवारी असतो. हा त्यांचा विचार सर्वधर्मसमभाव आणि समतेचा संदेश देणारा आहे. परमेश्वर हा सच्चिदानंदस्वरूप असून जन ही त्याची वेशभूषा आहे, अशी देव संकल्पना त्यांनी या भाषणातून व्यक्त केली आहे. चार्वाक, गौतम बुद्ध, श्रीकृष्ण, गांधी या महात्म्यांनी आणि कबीर, तुकाराम, तुलसीदास या साधुसंतांनी धर्माच्या बाबतीत जी व्यवहारबुद्धी दाखवली आहे ती महत्त्वाची आहे. नैसर्गिक साधनसंपत्तीचे रक्षण, संवर्धन आणि समान वाटप होण्यासाठी विश्वबंधुत्वाची भावना रुजवण्याची जो धर्म मानवाच्या उपयोगी पडेल, तोच खरा धर्म आहे. खऱ्या धर्मामुळे धर्मातील पोकळ अवंडबर दर होऊन तो सामान्य माणसाला दोन वेळेच्या भाकरीप्रमाणे ओळखता यावा असा सहज धर्मच जनसामान्याला जगण्याची दिशा दाखवेल.

 सयाजीराव महाराजांच्या या धार्मिक सुधारणा बडोद्यातील काही मंडळींना आवडत नव्हत्या. नाराज झालेल्या सनातन विचारांच्या मंडळीत सत्तेला विरोध करण्याची हिंमत नव्हती; पण सयाजीरावांच्या या कामाला पायबंद घालण्याचा प्रयत्न झाला. त्याचं बोलकं उदाहरण पुढे देत आहे.

सयाजीराव गायकवाड धर्म विषयक विचार / ११