Jump to content

पान:सयाजीराव गायकवाड आणि शाहू छत्रपती.pdf/४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

बरोबरीचे मित्र आहेत, मांडलिक नाहीत. यामुळे सयाजीरावांनी रेसिडेंट आणि कर्झनसारख्या व्हॉइसरायना हिमतीने कळविले, मी 'तुमचा नोकर नाही.
 कोल्हापूरचे दिवाण बहादूर अप्पासाहेब लठ्ठे यांनी शाहू छत्रपतींच्या आठवणी १९२४ साली प्रकाशित केल्या. या शाहू चरित्रास गुरुवर्य फ्रेझरांची प्रस्तावना आहे. त्यात ते लिहितात, शाहू महाराजांना प्रसिद्धीची आवड नव्हती; त्यामुळे देशात आणि विलायतेत ते इतर संस्थानिकांच्या मानाने कमी परिचित होते. आपल्या कनिष्ठ थरातील बांधवांनी उन्नती करण्यासाठी जटिल सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रात त्यांनी केलेले काम महत्त्वाचे आहे. शाहू महाराजांनी राजद्रोहविरोधी मोहिमेत स्वत:ला झोकून दिले. आपल्या मुलखात होणाऱ्या सरकारविरोधी कृत्यांना तोंड देण्यात समाधान न मानता इतर इलाख्यात इतरत्र झालेली कारस्थाने उघडकीस आणण्यासाठी त्यांनी जे प्रयत्न केले ते ब्रिटिश सरकारच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण होते. सरकारनेही त्यांची इमानदारी मान्य करून १९०९ साली त्यांना एकवीस तोफांचा वैयक्तिक सन्मान अर्पण केला. (फ्रेझर, राजर्षी शाहू, २००७, २८८)

 १९०९ साली एकीकडे ब्रिटिश सरकार सयाजीरावांच्या राजद्रोही कारवायांविरुद्ध गंभीरपणे १९०९ साली उपाययोजना करीत असताना, त्याच वर्षी शाहू महाराजांच्या इमानदारीसाठी एकवीस तोफांचा सन्मान देणे, ही सरकारची दुटप्पी चालच

सयाजीराव गायकवाड आणि शाहू छत्रपती / ४१