Jump to content

पान:सयाजीराव गायकवाड आणि शाहू छत्रपती.pdf/१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



२ : दोन लोकोत्तर पुरुष : व्यक्तिमत्त्व साम्य-भेद
 सयाजीरावांनी स्वतः शिकून शिक्षणाच्या माध्यमातून ब्रिटिश अमदानीत धर्मनिरपेक्ष आधुनिक लोकशाही मूल्यांचा पाठपुरावा करणारा राजा अशी आपली स्वतःची ओळख निर्माण केली. चक्रवर्ती राजगोपालाचारी म्हणतात. 'हिंदुस्थानात दोन खरे राजे झाले आहेत, ते आहेत शिवाजी महाराज आणि सयाजीराव. ' इतिहासाचार्य वि. का. राजवाड्यांनी महाराष्ट्रातील शंभर वर्षांतील कर्तृत्ववान व्यक्तींची यादी केली. यात पहिले नाव होते सयाजीराव गायकवाडांचे. महात्मा गांधींनी येरवड्याच्या सेंट्रल जेलमधून सयाजीरावांना लिहिलेल्या पत्रात म्हटलंय, 'महाराज सयाजीराव गायकवाडांनी बडोदा संस्थानात हरिजनासाठी शिक्षणाची दारं उघडली आणि अस्पृश्तेचा कलंक दूर करून भारतात प्रथमच कायद्याने अंमलबजावणी केली.
 प्रबोधनकार ठाकरे शाहू छत्रपतीसंबंधी लिहितात, 'शाहू छत्रपती हे पट्टीचे राजकारणी, मुत्सद्दी, खंबीर समाजसुधारक, धैर्यवान क्रांतिकारक आणि सक्रिय अस्पृश्योधारक होते. ' 'शाहू छत्रपती सामाजिक व धार्मिकदृष्ट्या जहाल; पण राजकीयदृष्ट्या मवाळ किंवा नेमस्त विचारसरणीचे होते,' असे य. दि. घाटे यांनी बडोदा आणि कोल्हापूर संस्थानात शिक्षण विभागात महत्त्वाच्या पदी कार्य केले होते. 'दिवस असे होते' हे पुस्तक त्यांनी लिहिले.

 महाराजा सयाजीराव गायकवाड आणि राजर्षी शाहू छत्रपती हे दोघे कर्तृत्ववान युगपुरुष होते. या दोन्ही व्यक्तिमत्त्वात मूळत:

सयाजीराव गायकवाड आणि शाहू छत्रपती / १७