पान:सयाजीरावांचा सामाजिक, सांस्कृतिक धार्मिक सुसंवाद.pdf/९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________

संमती दिली. देवासच्या घाडगे सरदार घराण्यातील गजराबाईंशी २८ डिसेंबर १८८५ ला विवाह होऊन चिमणाबाई दुसऱ्या महाराणी बनल्या; पण निद्रानाशाच्या त्रास कमी होईना. प्रकृती उपचारासाठी विलायतेत जावे, असे तज्ज्ञ डॉक्टरांनी सुचविले आणि १८८७ मध्ये महाराजा सयाजीराव यांचा पहिला विलायत प्रवास घडला.
 अर्ध्या जगावर साम्राज्य पसरलेल्या ब्रिटिश सत्तेच्या प्रशासन अन् सामर्थ्याचे रहस्य कशात आहे, हे शोधण्याची सयाजीरावांची जिज्ञाचा उफाळून आली. या परदेश प्रवासात त्यांनी प्रकृती स्वास्थ्याच्या उपचारासोबत लंडनमधील शिक्षण संस्था, कार्यालये, उद्योगधंदे, ग्रंथालये, वस्तुसंग्रहालये पाहिले. प्रत्येक गोष्टींची डायरीत नोंद ते करू लागले. त्या विषयातील व्यक्तींशी चर्चा करू लागले. सार्वभौम सत्तेच्या सामर्थ्याचे एक एक पैलू त्यांच्या समोर उलगडत गेले आणि त्यांनी मनाशी ठाम निश्चय केला. जे जे नावीन्यपूर्ण, जनतेच्या हिताचे अन् उपयोगाचे आहे, ते ते बडोद्यासाठी घेऊन जायचे.
 शिक्षण हेच परिवर्तन सुधारणा साधन :

 अक्षरओळख अन् अंकज्ञानाच्या शिक्षणाने सुरुवात केलेल्या सयाजीरावांनी अस्पृश्य-वंचितांच्या शिक्षणाने राजकर्तव्य आणि समाजक्रांतीची सुरुवात केली, हे आपण पाहिले. त्यावेळी बडोदा राज्यात शंभराहून कमी शाळा होत्या. पुढे सक्तीचे मोफत प्राथमिक शिक्षण सुरू करून त्यांच्या कालखंडात जवळपास साडेतीन

सयाजीरावांचा सामाजिक, सांस्कृतिक धार्मिक सुसंवाद / ९